sisters love story : एकाच तरुणावर तीन सख्ख्या बहिणींचे प्रेम; मुलासोबत घर सोडून पळाल्या!


मुरादाबादः प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. पण असं विनाकारण म्हटलं जात नाही. अनेकदा प्रेमात अशी स्थिती निर्माण होते. आता उत्तर प्रदेशातील रामपूरमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. इथे तीन सख्ख्या बहिणींचं एकाच तरुणावर प्रेम जडलं. पण त्यांचं हे प्रेम फार काळ लपून राहिलं नाही. कुटुंब आणि समाजात हे प्रेम प्रकरण समोर आल्यानंतर त्यांना विरोध झाला. पण प्रेमात आंधळ्या झालेल्या तिन्ही बहिणींनी ऐकलं नाही. समाज आणि कुटुंबाची चिंता सोडून तिन्ही बहिणी युवकासोबत घर सोडून पळाल्या.

प्रेमाची ही अजब कहाणी अजीमनगर पोलिस ठाण्याच्या परिसरातील आहे. जवळपास एक आठवड्यापूर्वी एका गावातील तीन सख्ख्या बहिणी घरात कुणालाही काहीही न सांगता निघून गेल्या. अचानक तिन्ही मुली बेपत्ता झाल्याने कुटुंबीय आणि नातेवाईक घाबरले. त्यांनी गाजावाजा न करता आधी आपल्या परिने मुलींचा शोध सुरू केला. नातेवाईकांकडे तपास केला. पण ओळखीच्या व्यक्तींकडे तपास केला, पण त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही. पण या प्रयत्नात अखेर गावात आणि पंचक्रोशित ही बातमी पसरली. यानंतर वेगवगेळ्या चर्चा सुरू झाल्या. या चर्चांनी प्रेमाच्या अजब कहाणीलाही जन्म दिला.

Telangana: पाठ्यपुस्तकात ‘कुराण’ हाती घेतलेल्या दहशतवाद्याचा फोटो, तेलंगणात गदारोळ

बेपत्ता असलेल्या तिन्ही बहिणी या एका युवकासोबत पळून गेल्या, अशी चर्चा आहे. यातील एक बहिणी ही अल्पवयीन आहे. तिन्ही बहिणी एकाच युवकासोबत पळून गेल्याने गावकरीही चकीत झाले आहेत. दुसरीकडे त्यांचे कुटुंबीय अजूनही त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांना अद्याप या घटनेची माहिती देण्यात आलेली नाही. तीन बहिणी बेपत्ता झाल्याची कुठलीही तक्रार कुटुंबीयांकडून अद्याप आलेली नाही. पण त्यांनी तक्रार दाखल केल्यास पोलिस त्यांना नक्कीच मदत करतील, असं अजीमनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी रविंद्र कुमार यांनी सांगितलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: