श्रीमती संजीवनी दोशी यांनी आपले जीवन जैन मान्यतेनुसार मृत्युकडे वाटचाल करणारे घेतले नियम सल्लेखना व्रत
श्रीमती संजीवनी दोशी यांनी आपले जीवन जैन मान्यतेनुसार मृत्युकडे वाटचाल करणारे घेतले नियम सल्लेखना व्रत

मोडनिंब ,दि 26 सप्टेंबर 2021- श्रीमती संजीवनी अभयकुमार दोशी , बारामती जि पुणे यांनी आपले जीवन जैन मान्यतेनुसार मृत्युकडे वाटचाल करण्याचा नियम सल्लेखना व्रत घेऊन निर्धार केला आहे .

मोडनिंब गावाच्या जि सोलापूरच्या इतिहासात हा एक पुण्यप्रद योगायोग आला आहे .याचे कारण श्रीमती संजीवनी अभयकुमार दोशी यांचे मोडनिंब हे आजोळ आहे . त्यांचे आजोबा स्व.वालचंद नानचंद शहा वकील ह्याच गावाचे आहेत. ते एक प्रथित यश प्रसिद्ध मराठी ऐतिहासिक कादंबरीकार होते . त्यांच्या लेखन कारकिर्दीस 100 हुन अधिक वर्ष लोटली आहेत . त्यांच्या कादंबऱ्या लोकमान्य टिळक ,दादाभाई नौरोजी, वीर सावरकर , ना सी फडके यांनी नावाजलेल्या आहेत.श्रीमती संजीवनी अभयकुमार दोशी यांचे आजोबा ह्यांनी 13 अश्या ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत - छत्रसाल, सम्राट अशोक ,सम्राट चंद्रगुप्त ,शनवार वाडा, विश्वामित्र ,रावबाजी ,उगवते अंकुर ,बजाजी निंबाळकर, तीर्थंकर महावीर यांच्या जीवनावर आधारित अंहिसा सम्राट ,शिवाजीचे मित्र व शत्रू ,जर्मन युध्दा वरील मोहीम ,प्रणयी युवराज - नाटक,
त्यांच्या 2 कादंबऱ्या सम्राट अशोक व छत्रसाल या मुंबई विद्यापीठात अभ्यासक्रमात होत्या.


दैनिक प्रभात चे संपादक व मालक वा. रा. कोठारी हे त्यांचे मेव्हणे होते. सुप्रसिद्ध दागिन्यांची पेढी मेसर्स चंदुकाका सराफ चे मालक चंदुलाल सराफ बारामती यांना वालचंद नानचंद यांची बहीण दिली होती.त्यांनी करकम गांवचे हुतात्मे श्री मोतीचंद पदमसी याना फाशी शिक्षा झाली होती तेंव्हा त्यांचे वकील म्हणून बिहार मधील आरा या गांवी जाऊन 1913 साली केस लढवली होती . त्यांच्या श्रीमती संजीवनी दोशी या नाती होत्या.

श्रीमती संजीवनी दोशी यांनी 1917साली मोडनिंब येथे प्राथमिक शाळा उमाराजे पटवर्धन यांच्या मदतीने चालू केली . त्याच शाळेत ते गणित व इतर विषय शिकवत असत . त्यांच्या कन्या विजया उर्फ श्रीमती या वकील शिवलाल गुलाबचंद शहा जे वालचंदनगर इंडस्ट्री या कंपनीचे कायदेशीर सल्लागार होते यांच्या पत्नी होत.त्यांची कन्या श्रीमती संजीवनी दोशी ह्या होत. त्या संजीवनी अभयकुमार दोशी यांनी दुर्धर आजार झाल्याने जैन तत्त्वानुसार जीवन त्याग करण्याची इच्छा व्यक्त केली.मोडनिंब येथील चतूर्मुख श्री मुनिसुव्रत जैन मंदिरात आर्यिका श्रृतमती माताजी ससंघ यांच्या मार्गदर्शनात त्यांची ही नियम सल्लेखना धीरोदात्तपणें मार्गक्रमण करीत आहे.
श्रीमती संजीवनी अभयकुमार दोशी यांनी अनेक जैन ग्रंथांचे वाचन स्वाध्याय करून ते मराठी भाषेत सुबोध सरळ पद्धतीने लिहिले आहेत.आजोबांचा साहित्य वारसा त्यांनी धार्मिक क्षेत्रात लिखाण करून टिकवला आहे . त्यांना या महत्तम अंतिम क्षणासाठी त्यांचे कुटुंबीय अभयकुमार दोशी, पुत्र डॉ. राजेंद्र , शीतल दोशी ,सौ .वृषाली दोशी,अजय दोशी ,कन्या तरुणी मेहता गुलबर्गा ,बंधू अजित गुलाबचंद शहा पुणे परिवार यांनी सहयोग दिला आहे .
मोडनिंब गावचे जैन श्रावक- श्राविका समस्त जैन समाज यांनी या मृत्यू महोत्सवात भाग घेतला आहे . श्री 1008 पद्मप्रभू जैन मंदिरचे सर्व ट्रस्टी, सदस्य व अध्यक्ष आणि मोडनिंब गावचे उप सरपंच विशाल बाहुबली मेहता धर्म प्रभावना करण्यास हातभार लावत आहेत.
या मृत्यू महोत्सवासाठी सोलापूर जिल्हासह इतर जिल्ह्यातील जैन समाजाच्या भावना त्यांच्या सोबत आहेत.