Sharmistha Mukherjee: माजी राष्ट्रपती कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांचा राजकारणाला राम-राम!


हायलाइट्स:

  • ‘सामाजिक आणि कला – संस्कृती क्षेत्रातून आपलं काम सुरू राहील’
  • राजकारणाचा कंटाळा आल्याचा शर्मिष्ठा यांचा खुलासा
  • इतर पक्षात दाखल होण्याची शक्यता फेटाळली

नवी दिल्ली :माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राजकारण सोडलं तरी सामाजिक आणि कला – संस्कृती क्षेत्रातून आपलं काम सुरूच राहील, असंही शर्मिष्ठा यांनी स्पष्ट केलंय. सोबतच काँग्रेसच्या सदस्य म्हणून कायम राहीन असंही त्यांनी म्हटलंय.

मुख्य म्हणजे, सोशल मीडियावर एका युजरनं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शर्मिष्ठा यांनी हा खुलासा केला आहे. या ट्विटमध्ये युझरनं त्यांना ‘उत्तम राजकारणी’ म्हणत संबोधलं होतं.

‘खूप आभार परंतु, मी आता राजकारणी नाही. मी राजकारण सोडलंय. काँग्रेसची प्राथमिक सदस्य आहे आणि राहील. परंतु, आता सक्रीय राजकारणात परतणार नाही. इतर व्यक्तींप्रमाणे इतर मार्गांतून राष्ट्राची सेवा करत राहील’, असं शर्मिष्ठा यांनी या ट्विटला उत्तर देताना म्हटलंय.

राजकारणाचे धडे घेणं हा माझ्यासाठी एक चांगला अनुभव होता. तसंच मला काम करण्याची संधी देण्यासाठी मी पक्षाचे आभार मानू इच्छिते. मी माझ्याकडून १०० टक्के देण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुळातच मी राजकारणी नाही याची मला जाणीव झाली. लोकशाही बहुलतावादी भारताची दृष्टी केवळ राजकारण नाही. आपण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं योगदान देऊ शकतो, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

काँग्रेस सोडून इतर एखाद्या पक्षात सामील होण्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली. ‘जर मला राजकारणातच राहायचं असेल तर मी माझा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात का प्रवेश करेल?’ असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला.

मी लहानपणापासूनच सत्ता पाहिली आणि अनुभवलीय. परंतु, राजकारण मला प्रेरणा देत नाही. एक शांतीप्रिय आयुष्य जगण्याची माझी इच्छा आहे आणि मला तेच करायची इच्छा आहे जे माझ्यासाठी योग्य आहे, असं म्हणत त्यांनी राजकारणाचा कंटाळा आल्याची भावना व्यक्त केली.

‘मॅडम, काहीच आशा उरली नाही…’ काँग्रेसचा राजीनामा देत नेत्याचे सोनिया गांधींना पत्र

asaduddin owaisi : ‘हैदराबादमधील चारमीनार आमच्या अब्बाची इमारत, या अब्बासमोर’
बंधू अभिजीत तृणमूलमध्ये…

उल्लेखनीय म्हणजे, काही दिवसांपूर्वीच शर्मिष्ठा यांचे बंधू अभिजीत मुखर्जी यांनी काँग्रेसचा हात सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अभिजीत यांनी पक्ष सोडल्यानंतर शर्मिष्ठादेखील तृणमूलमध्ये प्रवेश करू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु, राजकारणातूनच बाहेर पडणार असल्याचं सांगत त्यांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

कोण आहेत शर्मिष्ठा मुखर्जी?

शर्मिष्ठा मुखर्जी या माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या असून त्या उत्तम कथ्थक नृत्यांगना आणि कोरिओग्राफरही आहेत. जुलै २०१४ मध्ये शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१५ मध्ये त्यांन काँग्रेसच्या तिकिटावर दिल्लीत ग्रेटर कैलाश विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, आम आदमी पक्षाच्या सौरभ भारद्वाज यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

bhabanipur election : भवानीपूर घटनेप्रकरणी निवडणूक आयोगाने मागितला अहवाल; पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी
Telangana: पाठ्यपुस्तकात ‘कुराण’ हाती घेतलेल्या दहशतवाद्याचा फोटो, तेलंगणात गदारोळ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: