चीनकडून पूर्व लडाख सीमेवर जुळवाजुळव सुरूच; लष्करी तळ बळकट करण्यावर भर


नवी दिल्ली/बीजिंग: भारत आणि चीन यांच्यामधील सीमेवर पूर्व लडाखच्या भागात झालेल्या संघर्षाला १७ महिने होत असतानाच, चीनने पुन्हा आपले खरे रूप दाखवले आहे. या भागात आपले लष्करी तळ अधिक बळकट करण्यासोबतच भारतालगतचे हवाई तळही अद्ययावत करत असतानाच, चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आपल्या सैनिकांसाठी आणखी निवारे उभारले आहेत. त्यामु‌ळे या भागातून सैन्यमाघारीचा चीनचा मनसुबा नसल्याचे उघड झाले आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पूर्व लडाखच्या जवळ किमान आठ ठिकाणी चीनच्या लष्कराने जुळणी करता येणाऱ्या कंटेनरच्या साह्याने नवीन निवारे उभारले आहेत, अशी माहिती गस्त आणि गुप्तवार्ता अहवालात समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर उत्तरेस काराकोरम खिंडीजवळील वाहाब झिलगा या ठिकाणापासून ते पियू, हॉट स्प्रिंग्ज, चांग ला, ताशिगाँग, मानझा आणि चुरूप या भागात हे नवीन निवारे उभारले आहेत. प्रत्येक ठिकाणी सात गटांमध्ये ८० ते ८४ कंटेनर उभारण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. मागील एप्रिल-मे महिन्यात झालेल्या संघर्षापासून चीनने उभारलेल्या निवाऱ्यांमध्ये या नवीन निवाऱ्यांची भर पडली आहे.

हिंदी-पॅसिफिक महासागरात चीनला वेसण घालणार; ‘क्वाड’ गटाचा निर्धार!
चीनने लडाखमध्ये केलेल्या युद्धसज्जतेची धग भारताला जाणवत असली, तरी भारताने चिनी लष्कराला दीर्घकाळ सीमेजवळ तैनाती आणि व्यापक बांधकामास भाग पाडले आहे, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. चीनसाठी ही बाब खर्चिक आहे. भारतीय फौजांना प्रतिकूल पर्वतीय प्रदेशाची सवय असली, तरी चिनी सैनिकांचा याची सवय नाही. त्यामुळे त्यांच्या मनोधैर्यावरही परिणाम झाला आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

‘या’ आघाडीत भारताचा समावेश करण्यास अमेरिकेचा नकार
विमाने, ड्रोनचा वापर

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत भारत आणि चीनने आपले प्रत्येकी ५० हजार सैनिक तोफा, रणगाडे आणि जमिनीवरून हवेत डागण्याच्या क्षेपणास्त्रांसह तैनात ठेवले आहेत. दोन्ही लष्करांकडून वारंवार नव्या दमाचे सैनिक येथे पाठवले जात असून परस्परांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विमाने आणि ड्रोनचाही वापर केला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: