भारत टी-२० वर्ल्डकप संघात बदल करणार का? या खेळाडूंमुळे टेन्शन वाढले
सध्या युएईमध्ये आयपीएलचा हंगाम सुरू आहे. तेथेच टी-२० वर्ल्डकप देखील होणार आहे. ज्या खेळाडूंची भारताच्या वर्ल्डकप संघात निवड झाली आहे त्याच्या आयपीएलमधील कामगिरीवर सर्वांचे लक्ष आहे. निवड झालेल्यापैकी विराट कोहली वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला खास कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे यासंदर्भात सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. भारतीय निवड समिती आयपीएलमधील कामगीरीवरून संघात काही बदल करतील का किंवा असे बदल करण्याचे धाडस दाखवतील का असा प्रश्न सर्वजण करत आहेत.
वाचा-गुणवत्तेची कमी नाही, पण डोक वापरत नाही; सेहवागचा या खेळाडूला टोला
आयपीएलच्या पहिल्या सत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा यांना अद्याप लैकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. या तिघांपैकी रोहितने गेल्या दोन सामन्यात चांगली सुरूवात करून दिली आहे. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. सूर्यकुमार आणि ईशानची फलंदाजी काळजीचा विषय ठरला आहे. याच बरोबर संघातील ऑलराउंडर हार्दिक पंड्या हा देखील नुकताच फिट झाला आहे. गेल्या काही काळात त्याने चमकदार कामगिरी केली नाही. त्याचा फिटनेस हा देखील चर्चेचा विषय झालाय.
वाचा-वडील बाद झाल्यावर मुलाला राग अनावर झाला; पाहा काय केले
सूर्यकुमार आणि ईशान यांची कामगिरीच्या आधारावर वर्ल्डकप संघात निवड झाली होती. पण आता त्याची कामगिरी पाहता ते वर्ल्डकप संघात कसे काय योगदान देतील असा प्रश्न सर्व जण विचारत आहेत. युएईमध्ये झालेल्या सामन्यात ईशानने ३४ तर या हंगामात ८ सामन्यात १०७ धावा केल्या आहेत. बेंगळुरू विरुद्ध झालेल्या सामन्यानंतर विराट कोहलीने ईशान किशनला बाजूला घेऊन चर्चा केली होती. आयपीएलच्या शिल्लक सामन्यात हे खेळाडू धावा करू शकले नाही तर निवड समिती मोठा निर्णय घेणार का हे पाहावे लागले.