चिंताजनक! करोनामुळे जगभरातील आयुर्मानात घट


लंडन: करोना साथीमुळे जगभरातील आयुर्मानात घट झाली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर आयुर्मानात झालेली ही मोठी घट असून, मृत्यूदर कमी करण्याच्या प्रगतीला फटका बसला आहे, असे ऑक्सफर्ड विद्यापीठाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अभ्यासात म्हटले आहे.

संशोधकांच्या पथकाने २९ देशांतील मृत्यूदराची आकडेवारी एकत्र केली. त्यामध्ये युरोप, अमेरिका आणि चिलीसारख्या देशांचा समावेश आहे. या देशांनी २०२०मधील मृत्यूंची अधिकृत माहिती जाहीर केली आहे.

‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ एपिडेमॉलॉजी’मध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार २९ पैकी २७ देशांमध्ये २०२० या वर्षात आयुर्मानात घट झाली आहे. या देशांनी मृत्यूदर कमी करण्यात गेल्या काही वर्षांत केलेल्या प्रगतीला मोठा फटका बसल्याचेही या अभ्यासात म्हटले आहे. या देशांना आयुर्मानात एक वर्षे वाढ करण्यासाठी सरासरी ५.६ वर्षांचा कालावधी लागला आहे. मात्र, करोना साथीमुळे २०२०मध्ये या प्रगतीला फटका बसल्याचे अभ्यासात नमूद केले आहे.

चिंताजनक! अमेरिकेत पहिल्यांदाच जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक
या अभ्यासानुसार २९ देशांतील पुरुषांच्या आयुर्मानात महिलांच्या तुलनेत अधिक घट झाल्याचे समोर आले आहे. अमेरिकेतील पुरुषांचे आयुर्मान सर्वाधिक घटले असून, २०१९च्या तुलनेत त्यामध्ये २.२ वर्षांनी घट झाली आहे. त्याखालोखाल लिथुआनियातील पुरुषांचे आयुर्मान १.७ वर्षांनी घटले आहे.

वायू प्रदूषणाचे नियम कडक; WHO ने घेतला ‘हा’ निर्णय

सिंगापूरमध्ये १९३९ नवे रुग्ण

सिंगापूरमध्ये रविवारी १९३९ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामध्ये ३९८ रुग्ण परदेशी कर्मचारी आहेत. नवीन रुग्णांपैकी १५३६ रुग्ण स्थानिक संसर्गाचे असून, पाच जण परदेशातून आलेले आहेत, असे सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. उर्वरीत रुग्ण परदेशी कर्मचारी आहेत. त्यापैकी स्थलांतरित कर्मचाऱ्यांच्या ब्लू स्टार डॉर्मिटरीत ४० नवे रुग्ण आढळले आहेत.

चिनी लशीचा दिलासा! डेल्टा वेरिएंटविरोधात ७९ टक्के प्रभावी असल्याचा दावा

२९ देशांमध्ये बनावट करोना लसीकरण प्रमाणपत्रात १० पटीने वाढ!
दक्षिण कोरियात बारा वर्षांपुढील मुलांना लस

दक्षिण कोरियाने १२ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांना करोना प्रतिबंधक लस देणार असल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय ७५ वर्षांपुढील नागरिकांना लशीचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. जुलैच्या सुरुवातीपासून दक्षिण कोरियात करोना संसर्गाची चौथी लाट आहे. देशातील ६० वर्षापुढील नागरिकांचे ९० टक्के, तर १८ ते ५९ वयोगटाचे ८० टक्के लसीकरण ऑक्टोबरअखेर पूर्ण करण्याचे दक्षिण कोरियाने ठरवले आहे. दक्षिण कोरियात रविवारी २३८३ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: