दोन लाख कोटींचा चुराडा ; चौफेर विक्रीने शेअर बाजारात मोठी पडझड


हायलाइट्स:

  • जोरदार विक्री झाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीला झळ बसली आहे.
  • आज मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १००० अंकांनी कोसळला.
  • राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २५० अंकांनी आपटला.

मुंबई : तेजीच्या लाटेने वधारलेल्या शेअरमध्ये जोरदार विक्री झाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीला झळ बसली आहे. आज मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १००० अंकांनी कोसळला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २५० अंकांनी आपटला. या पडझडीने गुंतवणूकदारांना जवळपास दोन लाख कोटींचा फटका बसला आहे.

पेट्रोल-डिझेलचा भडका ;पेट्रोलियम कंपन्यांच्या दरवाढीने देशभरात इंधन महागले
दोन्ही निर्देशांकांनी आज दिवसाची सुरुवात सावध केली होती. बाजारात सकाळपासून नफावसुलीचा दबाव होता. दुपारी चौफेर विक्रीची तीव्रता वाढली. आयटी कंपन्या, ऑटो तसेच स्थावर मालमत्ता क्षेत्रात गुंतवणूकदारांनी नफावसुलीचा सपाटा लावला.

आयसीआयसीआय बँक, फिनोलेक्स केबल, डीएलएफ, इंडियाबुल्स रियाल इस्टेट, ओबेराय रियल्टी, प्रेस्टिज इस्टेट, सनटेक रियल्टी, शोभा या शेअरमध्ये घसरण झाली. त्याचबरोबर आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये आज सलग दुसऱ्या सत्रात घसरण दिसून आली. माइंड ट्री, एचसीएल टेक, एम्फसिस, एल अँड टी इन्फोटेक आदी शेअर घसरले आहेत.

सोने-चांदी गडगडले ; सहा महिन्यांतील सर्वात कमी दरात मिळतंय सोने, जाणून घ्या भाव
बँकिंग क्षेत्रात मात्र खरेदीचा ओघ कायम आहे. आयडीबीआय बँक, पीएनबी बँक, कॅनरा बँक, एसबीआय, युनियन बँक ऑफ इंडिया या शेअरमध्ये वाढ झाली आहे. दोन सत्रात एनटीपीसीचा शेअर ६ टक्क्यांनी वाढला आहे. ऑइल आणि एनर्जी क्षेत्रात इतर कंपन्यांच्या शेअरमध्ये देखील वाढ झाली आहे. ज्यात इंडियन ऑइल, ऑइल इंडिया, पेट्रोनेट एलएनजी, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम या शेअरमध्ये वाढ झाली आहे.

उच्च परतावा आणि कमी जोखीम ; सॅमको एसेट मॅनेजमेंटने सुरु केली पहिल्यांदाच ही सुविधा
सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८८२ अंकांनी घसरला असून तो ५९१९५ अंकावर आहे. निफ्टी २३४ अंकांनी कोसळला असून तो १७६२० अंकांवर आहे. चीनमधील एव्हरग्रँडे कंपनीवरील कर्ज संकटाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. ज्यामुळे आशियातील प्रमुख भांडवली बाजारात आज घसरण झाल्याचे शेअर दलालांनी सांगितले. जपानचा निक्केई, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया या शेअर बाजारात आज घसरण झाली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: