Indian Army: ​उरीमध्ये पाकिस्तानी दहशतवादी जिवंत सुरक्षादलाच्या हाती, १९ वर्षीय बाबर पाकिस्तानी नागरिक


हायलाइट्स:

  • जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी पाकिस्तानी नागरिक
  • १९ वर्षीय अली बाबर पात्रानं शरणागती पत्करल्यानं वाचला जीव
  • मुजफ्फराबादमध्ये मिळालं दहशतवादाचं ट्रेनिंग

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये भारतीय सेनेनं दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावलाय. मंगळवारी, उरी नियंत्रण रेषेजवळून भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन पाकिस्तान दहशतवाद्यांशी भारतीय जवानांची चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं तर एका १९ वर्षांच्या ‘लष्कर ए तोयबा‘शी संबंधित दहशतवाद्याला जिवंत अटक करण्यात आलीय. या दहशतवाद्याचं नाव बाबर असून तो पाकिस्तानी नागरिक असल्याचं समजतंय.

भारतीय सेनेसमोर शरणागती पत्करली

मेजर जनरल वीरेंद्र वत्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सेनेसमोर शरणागती पत्करणाऱ्या दहशतवाद्यानं आपली ओळख उघड केलीय. पाकिस्तानच्या पंजाबचा तो रहिवासी आहे. अली बाबर पात्रा असं त्याचं नाव आहे. ‘लष्कर ए तोयबा’मध्ये दाखल झालेल्या १९ बाबरला मुजफ्फराबादमध्ये दहशतवादाचं ट्रेनिंग देण्यात आलं होतं.

दिल्ली हिंसाचार : सीसीटीव्ही फोडणं हादेखील कटाचा भाग, हायकोर्टाची टिप्पणी
Kahnmigar Glacier: ‘लाहौल-स्पीती’नजिक खंमीगर ग्लेशिअरमध्ये १४ ट्रेकर्स अडकले; थंडीनं दोघांचा मृत्यू
काय घडलं सीमेवर?

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमेवर हालचाली दिसल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली. यावेळी दोन दहशतवाद्यांनी भारताच्या हद्दीत प्रवेश केला होता. तर चार सीमेपलिकडे होते. गोळीबारानंतर गर्द झाडीचा फायदा घेत पलिकडे चारही दहशतवादी जीव वाचवण्यात आणि माघारी जाण्यात यशस्वी ठरले. भारताच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या दोन दहशताद्यांना घेरण्यासाठी अतिरिक्त दल तैनात करण्यात आलं होतं.

सलामाबाद नाला भागाजवळ घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. याच भागाचा वापर दहशतवाद्यांनी २०१६ मध्ये उरी आर्मी बेसजवळ हल्ल्यादरम्यान करण्यात आला होता. या हल्ल्यात १९ भारतीय जवान शहीद झाले होते.

पाकिस्तान सेनेची मदत

भारतीय सेनेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या सात दिवसांत सात दहशतवाद्यांना ठार करण्यात आलंय. पाकिस्तानी सेनेच्या मदतीशिवाय एवढ्या मोठ्या संख्येत सीमेवर हालचाली होऊ शकत नाहीत. एलओसीच्या पलिकडे लॉन्च पॅडसवर हालचाली झाल्याची शक्यता मेजर जनरल वत्स यांनी व्यक्त केलीय.

दहशतवाद्यांचा घाताचा डाव समोर आल्यानंतर सेनेकडून उरी आणि रामपूर सेक्टरमध्ये अनेक मोहिमा हाती घेतल्या आहेत.

Punjab Elections: नवज्योत सिंह सिद्धूंचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
navjot singh sidhu -amarinder singh : सिद्धूंनी दिला पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; अमरिंदर सिंगांची बोलकी प्रतिक्रिया
amarinder singh : पंजाब काँग्रेसमध्ये बंड! अमरिंदर सिंग-अमित शहांच्या भेटीच्या चर्चेने दिल्लीत राजकीय भूकंप?Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: