अमेरिकेकडून ‘या’ क्षेपणास्त्राची चाचणी; रशिया-चीनला भरणार धडकी!वॉशिंग्टन: अफगाणिस्तानमधील बदलती परिस्थिती आणि रशिया-चीन सोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने एअर ब्रीथिंग हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीपेक्षाही पाचपट अधिक आहे. अमेरिकेच्या संरक्षण खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २०१३ पासून अशी चाचणी करण्याचे प्रयत्न सुरू होते.

अनेक देश हायपरसोनिक शस्त्रसाठा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. जुलै महिन्यात रशियानेदेखील Zircon हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. त्यानंतर आता अमेरिकेनेही हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे.अमेरिकेने मागील आठवड्यात ही चाचणी केली असल्याची माहिती पेंटागॉनने दिली. अमेरिका आपली लष्करी ताकद आणखी बळकट करत असल्याचेही पेंटागॉनने म्हटले. या वर्षाच्या अखेरपर्यंत आणखी एक चाचणी करण्याची तयारी सुरू असल्याचे पेंटागॉनने म्हटले.

हायपरसोनिक क्षेपणास्त्र एका तासात जवळपास ६२०० किमी अंतर पार करू शकते. त्याचा वेग ध्वनीपेक्षाही पाच पट अधिक असतो. अमेरिकेचा संरक्षण विभागाने सध्या पूर्णपणे हायपरसोनिक क्षेपणास्त्रांवर लक्ष केंद्रित केले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: