इंटरनेट बँंकिंग कोलमडली; आयसीआयसीआय बँंक आणि ‘एसबीआय’च्या ग्राहकांना फटका


हायलाइट्स:

  • आयसीआयसीआय बॅंकेची इंटरनेट बँकिंग सेवा आज सकाळपासून कोलमडली आहे.
  • अनेक ग्राहकांना नेट बँकिंग आणि यूपीआयवरून आर्थिक व्यवहार करता आलेले नाहीत.
  • ग्राहकांनी सोशल मीडियावर आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

मुंबई : खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बॅंकेची इंटरनेट बँकिंग सेवा आज सकाळपासून कोलमडली आहे. तांत्रिक दोष निर्माण झाल्याने अनेक ग्राहकांना नेट बँकिंग आणि यूपीआयवरून आर्थिक व्यवहार करता आलेले नाहीत. त्याचबरोबर भारतीय स्टेट बँकेच्या मोबाइल बँकिंग सेवा कोलमडली असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या आहेत. ग्राहकांनी सोशल मीडियावर आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

सोने-चांदी गडगडले ; सहा महिन्यांतील सर्वात कमी दरात मिळतंय सोने, जाणून घ्या भाव
आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना नेट बँकिंगचे व्यवहार करण्यास अडचणी येत आहे. अनेकांना यूपीआयचे व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागला आहे. व्यवहार पूर्ण होत असल्याने बँकेच्या ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, यासंदर्भात बँकेने कोणतेही निवेदन जारी केलेलं नाही. त्यामळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट आहे. अनेकांनी ट्विट करुन बँकेला याबाबत माहिती दिली आहे.

पेट्रोल-डिझेलचा भडका ;पेट्रोलियम कंपन्यांच्या दरवाढीने देशभरात इंधन महागले
आज सकाळी ८ ते ११ या दरम्यान, आयसीआयसीआय बँकेच्या २०० हून अधिक ग्राहकांनी इंटरनेट बँकिंगबाबत तक्रार केली आहे. दरम्यान देशातील मोठी बँक असलेल्या एसबीआयच्या ग्राहकांना देखील मोबाईल आणि नेट बँकिंग सेवेत तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनात आले आहे. याबाबत ग्राहकांनी एसबीआयला तक्रारी केल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: