चीनमध्ये भीषण वीज संकट; कारखाने मॉल्स बंद, वीज वापरावर निर्बंध


बीजिंग: चीनमधील पूर्व भागामध्ये सुरू असलेले वीज पुरवठ्याचे संकट आता गंभीर होत चालले आहे. मागणी आणि पुरवठ्याचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी अनेक कारखाने, मॉल्स, दुकाने बंद करावी लागली आहेत. तर, निवासी भागातही वीज वापराबाबत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोळसा पुरवठा सुरळीत होत नसल्याने त्याचा परिणाम वीज निर्मितीवर झाला आहे.

चीनमध्ये उत्पादकांकडून वाढत असलेल्या मागणीचा परिणाम कोळसा पुरवठ्यावरही होत आहे. कोळशाचे दरही वाढले आहेत. त्यातच वीज संकट गडद झाले आहे. या वीज संकटामुळे अॅपल, टेस्ला यांसारख्या कंपन्याचे कारखाने बंद होण्याची शक्यता आहे.

चांगचुन भागात मागील आठवड्यात कारखाने आणि निवासी भागांमध्ये समान वीज पुरवठ्यासाठी भारनियमन करण्यात आले होते. मात्र, नागरिकांनी वीज पुरवठा अंत्यत कमी प्रमाणात होत असून बराच वेळ वीज नसल्याची तक्रार केली.

चिनी लशीचा दिलासा! डेल्टा वेरिएंटविरोधात ७९ टक्के प्रभावी असल्याचा दावा
वीज संकटाचा मोठा परिणाम उत्पादन क्षेत्रावर झाला आहे. अनेक कारखान्यांना त्यांच्या गरजेनुसार वीज पुरवठा होत नाही. चीनच्या या भागात थंडीही कडाक्याची असते. त्यामुळे थंडीच्या दिवसात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी वीज पुरवठा करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

प्रशासनाने नागरिकांना वीज उपकरणांचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे. पाणी गरम करण्यासाठी वीजेच्या उपकरण न वापरण्यास सांगण्यात आले आहे. आणखी काही दिवस चीनमध्ये वीज संकट असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चीनकडून पूर्व लडाख सीमेवर जुळवाजुळव सुरूच; लष्करी तळ बळकट करण्यावर भर
करोना महासाथीच्या काळात चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. त्यानंतर अर्थव्यवस्था सुरळीत होत असताना आता वीज संकट आल्याने चीनसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. चीनमध्ये जवळपास १५ कंपन्यांनी उत्पादन बंद झाल्याची माहिती दिली आहे. तर, तैवान येथे नोंदणी असलेल्या ३० कंपन्यांनी वीज संकटामुळे उत्पादन थांबले असल्याचे म्हटले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: