kanhaiya kumar : काँग्रेसमध्ये प्रवेश करताच कन्हय्या कुमारांचा PM मोदी आणि RSS वर निशाणा; म्हणाले…
काँग्रेसमध्ये प्रवेश करताच कन्हय्या कुमार हे पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बरसले. आम्ही देशातील सर्वांत जुन्या लोकशाही पक्षात प्रवेश केला आहे. कारण काँग्रेस वाचली नाही तर देश टिकणार नाही, असं या देशातील लाखो आणि कोट्यवधी नागरिकांना वाटत असल्याचं कन्हय्या कुमार म्हणाले. विरोधी पक्ष कमकुवत झाल्यावर सत्ताधाऱ्यांची वाटचाल ही हुकूमशाहीच्या दिने होते. लोकसभेतील जवळपास २०० जागा अशा आहेत, जिथे भाजपसमोर काँग्रेसशिवाय कुठलाही पर्याय नाही. यामुळे देशातील सर्वात मोठ्या आणि जुन्या पक्षाला वाचवलं गेलं नाही. मोठ्या जहाजाला बुडण्यापासून वाचवलं गेलं नाही, तर छोट्या होड्यांचा आणि नावांचा काहीही उपयोग होणार नाही, असं कन्हय्या कुमार म्हणाले.
देशात जो वैचारिक संघर्ष सुरू आहे, त्याचे फक्त काँग्रेसच नेतृत्व करू शकते. भिंतीवर बसून बघण्याची ही वेळ नाही. काँग्रेस पक्ष हे एक मोठे जहाज आहे, जर काँग्रेस पक्ष जिवंत राहिला तर लाखो आणि कोट्यवधी तरुणांच्या आकांक्षा वाचतील, भगतसिंगांचा भारत वाचेल. याच आशेने आणि उमेदीने काँग्रेस पक्षात प्रवेश केला, असं कन्हय्या कुमार म्हणाले.
navjot singh sidhu -amarinder singh : सिद्धूंनी दिला पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजी
हा परिवार, संघ परिवार नाही, जे आपल्या कुटुंबाल सोडून नवीन कुटुंब बनवण्यास सांगतात. हे काँग्रेस परिवार हा कुणालाही कुटुंब सोडण्यास सांगत नाही. महात्मा गाधी कस्तूरबांना घेऊन इंग्रजांशी लढले. मग त्यांना घर सोडावं लागलं का? तर नाही. आंबेडकरही कुटुंबासोबत राहिले. इतिहास बघा, जेवढेही महापुरुष आहेत त्यांनी कधीच आपल्यापासून कुटुंबाला दूर केले नाही, असं म्हणत कन्हय्या कुमार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली.
bhabanipur by election : भवानीपूर पोटनिवडणूक होणार का? कोलकाता हायकोर्टाने दिला निर्णय
काँग्रेसमध्ये कन्हैया आणि जिग्नेशची भूमिका काय असेल याबाबत चित्र स्पष्ट नाही. तरुणांना काँग्रेसशी जोडण्यासाठी आणि केंद्रातील मोदी सरकार विरोधात आंदोलनांसाठी हे दोन्ही नेते एक मोहीम सुरू करतील अशी शक्यता आहे. बिहारमध्ये कन्हय्या कुमार आणि गुजरातमध्ये जिग्नेश मेवाणी यांना काँग्रेसकडून मोठं पद दिले जाईल, अशीही चर्चा आहे. या रणनीतीअंतर्गत येत्या काळात आणखी काही युवा नेते काँग्रेसमध्ये सहभागी होतील, असं सांगण्यात येतंय.