पाकिस्तानमध्ये १२ दहशतवादी संघटनांना आश्रय; पाच संघटनांकडून भारतविरोधी कारवाया


वॉशिंग्टन: जगभरात सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांपैकी १२ दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये असल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकन संस्था काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिसच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. या १२ संघटनांपैकी पाच संघटनांचे लक्ष्य भारत असल्याचे म्हटले गेले आहे.

सीआरसीच्या अहवालानुसार, अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी पाकिस्तानमधील अनेक दहशतवाद्यांचे तळ, त्यांना संचलित करणाऱ्या संघटनांची ओळख पटवली आहे. यातील काही संघटना वर्ष १९८० पासून पाकिस्तानमध्ये सक्रिय आहेत.

चीनकडून पूर्व लडाख सीमेवर जुळवाजुळव सुरूच; लष्करी तळ बळकट करण्यावर भर

भारताविरोधात या संघटना सक्रिय

या अहवालानुसार, लष्कर-ए-तोयबाची स्थापना वर्ष १९८० मध्ये पाकिस्तानमध्ये करण्यात आली होती. तर, वर्ष २००१ मध्ये ही संघटना जागतिक दहशतवादी संघटना म्हणून ओळखली जाऊ लागली. सन २००८ मध्ये या दहशतवादी संघटनेने मुंबईत भीषण दहशतवादी हल्ला केला. त्याशिवाय अनेक दहशतवादी कारवाया या संघटनेने केल्याचे अहवालात म्हटले आहे.

दहशतवादाच्या मुद्यावरून कमला हॅरिस यांनी पाकला फटकारले
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची स्थापना २००२ मध्ये करण्यात आली. मसूद अझहर या दहशतवाद्याने याची स्थापना केली. जैश-ए-मोहम्मदने भारतात अनेक दहशतवादी कारवाया केल्या आहेत.

हिजबुल मुजाहिद्दीनची स्थापना १९८९ मध्ये एक राजकीय पक्ष म्हणून झाली होती. मात्र, या संघटनेकडून अनेक दहशतवादी हल्ले करण्यात आले. सन २०१७ मध्ये या दहशतवादी संघटनेला जागतिक दहशतवादी म्हणून ओळखले जाऊ लागले.

बलुच बंडखोरांनी जिन्नांचा पुतळा बॉम्बने उडवला; जून महिन्यात झाले होते लोकार्पण
हरकत-उल-जिहाद-इस्लामी या दहशतवादी संघटनेची स्थापना १९८० मध्ये करण्यात आली. सोव्हिएत फौजांविरोधात या संघटनेची स्थापना झाली. मात्र, २०१० पर्यंत ही जागतिक दहशतवादी संघटना झाली. माहितीनुसार, सन १९८९ नंतर या संघटनेने भारतात दहशतवादी हल्ले सुरू केले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: