जळगावात खळबळ! पत्नी माहेरी गेल्यानं निराश झालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊलम. टा. प्रतिनिधी ।

गेल्या पाच महिन्यांपासून पत्नी माहेरी निघून गेल्यामुळे नैराश्याने ग्रासलेल्या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली. लक्ष्मण अशोक जाधव (वय २७, रा. सम्राट कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मोलमजुरी करणाऱ्या लक्ष्मणचे बडोदा (गुजरात) येथील रुपाली हिच्याशी पाच वर्षांपूर्वी लग्न झाले. दरम्यान, काही महिन्यांपासून कौटुंबिक कारणावरून तणाव निर्माण झाला होता. संतापात त्याची पत्नी रुपाली पाच महिन्यांपासून माहेरी निघून गेली आहे. यामुळे लक्ष्मणची मानसिक स्थिती बिघडली. यातून सोमवारी रात्री त्याने राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना निदर्शनास आल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

मृत लक्ष्मण याच्या पश्चात पत्नी रुपाली, मुलगा (प्रणव, वय ४ वर्षे), आई शर्मिला, राम व शुभम हे दोन भाऊ व एक विवाहित बहीण असा परिवार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: