म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता; जाणून घ्या ‘नाॅमिनेशन’चे महत्व आणि उपयुक्तता


हायलाइट्स:

  • नामनिर्देशन (नॉमिनेशन) ही अशी सुविधा आहे ज्याने वैयक्तिक युनिटधारकाला आपला नॉमिनी (वारसदार) नियुक्त करता येतो.
  • अॅम्फीच्या आकडेवारीनुसार जवळपास ९.७८ कोटी एकूण फाॅलिओज आहेत.
  • नॉमिनी नसलेल्या फाॅलिओंची संख्या एकूण फाॅलिओंच्या तुलनेत जवळपास २० ते २५ टक्के आहे.

गणेश राम, मुंबई : भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या म्युच्युअल फंड नियम १९९६ च्या कलम २९ ए च्या परिशिष्ट ४ नुसार म्युच्युअल फंडांना किरकोळ गुंतवणूकदारांपुढे नामनिर्देशनचा पर्याय उपलब्ध करणे आवश्यक आहे. नामनिर्देशन (नॉमिनेशन) ही अशी सुविधा आहे ज्याने वैयक्तिक युनिटधारकाला आपला नॉमिनी (वारसदार) नियुक्त करता येतो. जो युनिटधारकाचा अचानक मृत्यू झाला तर युनिटधारकाकडील युनिटची विक्री करणे किंवा गुंतवणूक पैसे काढून घेण्याचा दावा करू शकतो.

सोने-चांदी गडगडले ; सहा महिन्यांतील सर्वात कमी दरात मिळतंय सोने, जाणून घ्या भाव
भांडवली बाजार नियंत्रक सेबी आणि अॅम्फी यांनी ज्या गुंतवणूकदारांनी नॉमिनेशन केलेलं नाही, अशांना त्याचे महत्व पटवून देण्यासाठी अनेक उपायोजना केल्या आहेत. इतके प्रयत्न करून देखील आजच्या घडीला नॉमिनी नसलेल्या फाॅलिओंची संख्या एकूण फाॅलिओंच्या तुलनेत जवळपास २० ते २५ टक्के आहे.

दोन लाख कोटींचा चुराडा ; चौफेर विक्रीने शेअर बाजारात मोठी पडझड
करोना संकटाने पुन्हा गुंतवणूकदारांच्या नामनिर्देशनाचे (इन्व्हेस्टर नॉमिनेशन) गंभीर मुद्दयाला महत्व आले आहे. या संकटकाळात ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तींना (जे युनिटहोल्डर्स) गमावले अशाना युनिट्सबाबत संघर्ष करावा लागत आहे. ही प्रक्रिया आणखी सोपी करण्यासाठी अॅम्फीने ज्या ठिकाणी नॉमिनी नाही अशा वैयक्तिक युनिटधारकाचे मृत्युपश्चात युनिट हस्तांतर करण्याची किंवा क्लेम करण्यासाठी एक नियमावली तयार केली आहे. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया ही नेहमीच लांबलचक, अवघड आणि वेळखाऊ असते. नॉमिनेशनमुळे ही प्रक्रिया टाळता येईल आणि गुंतवणूक तसेच हस्तांतर आणखी सोपी होऊन जाईल.

नॉमिनेशन का महत्वाचे आहे याला पुष्टी देणारे काही मुद्दे
– अॅम्फीच्या आकडेवारीनुसार जवळपास ९.७८ कोटी एकूण फाॅलिओज आहेत. यातील वैयक्तिक गुंतवणूकदार हाताळत असलेले ६५ टक्के फाॅलिओज म्हणजेच ६.३६ कोटी फाॅलिओज आहेत. या ६.३६ कोटी फाॅलिओजपैकी समजा आपण ३० टक्के फाॅलिओज यांनी नॉमिनी नियुक्त केलेला नाही असे गृहीत धरले तरी तो आकडा १.९ कोटींच्या आसपास जाईल.

– या १.९ कोटीमध्ये (१) असेही फाॅलिओज आहेत जे नॉमिनी नियुक्त करणे बंधनकारक करण्यापूर्वी तयार झाले असतील, (२) फाॅलिओजच्या गुंतवणूकदारांना नॉमिनी निवड करण्याची आवश्यकता वाटली नसेल.

– अॅम्फीच्या आकडेवारीनुसार दावा न केलेली एकूण रक्कम (डिव्हिडंड आणि रिडम्प्शन) जवळपास ११०० कोटींच्या आसपास आहे. ( ईटी वेल्थच्या आकडेवारीनुसार हा आकडा १७८८० कोटी आहे.

– नॉमिनी नसलेले फाॅलिओजचा या दावा न केलेल्या एकूण रकमेत मोठा वाटा आहे. दावा न झालेली रक्कम स्वयंचलितपणे ७ वर्षांनंतर गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण फंडात वर्ग केली जाते.

वाचा : पेट्रोल-डिझेलचा भडका ;पेट्रोलियम कंपन्यांच्या दरवाढीने देशभरात इंधन महागले
आजच्या घडीला जर बघितले तर एका गुंतवणूकदाराचे ३ ते ४ फाॅलिओज वेगवेगळ्या एएमसीमध्ये असतात. जर गुंतवणूकदाराला नॉमिनेशन करायचे असेल तर त्याला प्रत्येक एएमसीमध्ये वैयक्तिक अर्ज सादर करावा लागतो किंवा त्याच्या RTA कडे तो भरून द्यावा लागतो. सध्याच्या करोना संकटात गुंतवणूकदाराला प्रत्यक्ष एएमसी आणि RTAs कार्यालयात जाणे देखील अवघड बनले आहे.

– ज्या फाॅलिओजमध्ये नॉमिनी नाही अशा प्रकरणी युनिट्स हस्तांतर करण्यासाठी एएमसींना वेळ आणि पैसा खर्च करावा लागत आहे.

नॉमिनीशिवाय असलेल्या फाॅलिओजला हाताळण्याचा आणि संख्या कमी करण्याचा प्रभावी मार्ग
– एएमसीनी आता नॉमिनीशिवाय असलेल्या फाॅलिओजवर लक्ष केंद्रीत करायला हवं. तसेच सध्या करोना संकटकाळात यासंदर्भात गुंतवणूकदारांमध्ये आणि त्यांच्या MFDs व RIAs कशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून पोहचून जनजागृती करता येईल याचा विचार करायला हवा.

– गुंतवणूकदार/ वितरक आणि RIAs यांना पुन्हा निर्देश देऊन MFU वापरण्याच्या सूचना कराव्यात. हे एकमेव व्यासपीठ आहे जिथे डिजिटल माध्यमातून सर्वच फाॅलिओजचे नॉमिनेशन अद्ययावत करणे किंवा त्यात सुधारणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि सर्वात कार्यक्षम आहे.

– नॉमिनेशनचे महत्व पटवून देणारे वेबिनार आणि जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करायला हवेत. ज्यांनी नॉमिनेशन केलेले नाही अशा गुंतवणूकदारांपर्यंत ही माहिती पोहोचायला हवी.

– असे उपक्रम यशस्वीपणे राबवणाऱ्या MFDs व RIAs यांना प्रमाणपत्राने गौरवले पाहिजे.

– विविध भाषांमधील जनजागृतीपर व्हिडीओ जो दोन मिनिटांहून कमी कालावधीचा असेल आणि ज्यात नॉमिनेशनचे महत्व आणि ते अद्ययावत कसे करावे याची माहिती असेल.

– एकूणच याचा सारासार विचार केला तर नॉमिनशेन नसलेल्या फाॅलिओजने म्युच्युअल फंड उद्योगापुढे गहन प्रश्न निर्माण केला आहे. यामुळे बेवारस किंवा दावा न केलेल्या रकमेमध्ये मोठी वाढ होत आहे.

– गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंड वितरकांनी यांनी याचे गांभीर्य ओळखून नॉमिनी नियुक्तीची प्रक्रिया झटपट केली पाहिजे. यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करायला हवा. यामुळे म्युच्युअल फंड उद्योगातील सर्वच घटकांसाठी समसमान संधी निर्माण होईल.

(लेखक एमएफ युटिलिटीज या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. लेखातील मते त्यांची वैयक्तिक आहेत.)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: