विराट कोहलीला या एकाच खेळाडूच्या तक्रारीमुळेच सोडावं लागलं कर्णधारपद, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…


नवी दिल्ली : विराट कोहलीने भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पण कोहलीला हा निर्णय कोणामुळे घ्याला लागला त्या भारतीय खेळाडूचे नाव आता पुढे आले आहे. या खेळाडूने बीसीसीआयला विराटविरुद्ध तक्रार केली होती. त्यानंतर बीसीसीआयने विराटवर दबाव वावढला आणि त्यानंतर विराटला ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडावे लागल्याचे पाहायला मिळाले होते.

भारताला न्यूझीलंडविरुद्ध विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर कोहला हा जास्तच आक्रमक झाला होता आणि तो भारतीय खेळाडूंना चांगली वागणूक देत नव्हता. विराटचे हे सर्व प्रताप पाहून भारतीय संघातील आर. अश्विन नाराज झाला आणि त्याने विराटची तक्रार थेट बीसीसीआयकडे केली. न्यूझीलंडडविरुद्धच्या पराभवानंतर विराटने कर्णधार म्हणून संघातील खेळाडूंच्या मनातील सन्मान कसा गमावला आहे, हे अश्विनने बीसीसीआयला सांगितले. त्यानंतर बीसीसीआयने सत्य परिस्थिती जाणून घेतली आणि त्यानंतर विराटला याबाबत जाब विचारल्याचे पाहायला मिळाले. बीसीसीआयने यावेळी संघाच्या नेतृत्वाबाबत विराटवर दडपण आणले आणि त्यानंतरच त्याने ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीचा रागही विराटने काढल्याचे पाहायला मिळाले. कारण विराटने इंग्लंडविरुद्धच्या चारही कसोटी सामन्यांमध्ये अश्विनला संधी न दिल्याचे पाहायला मिळाले. अश्विनला कोहली संधी का देत नाही, हे कोणालाच कळत नव्हते. पण आता त्यामागचे कारण समोर आले आहे. अश्विनने तक्रार केल्याचा राग कोहलीने अशापद्धतीने काढल्याचे पाहायला मिळाले.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर कोहली हा अधिक आक्रमक झाला होता आणि कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचबरोबर संघाती खेळाडूंबरोबरची त्याची वागणूक चांगली नव्हती. कारण कोहली संघातील खेळाडूंबरोबर आदराने वागत नव्हता. कोहलीला यावेळी काही जणांनी समजवण्याचा प्रयत्न केला होता, पण कोहली कोणाचेही ऐकण्याचा मनस्थितीत नव्हता. त्यामुळे अश्विनला यावेळी बीसीसीआयकडे विराटची तक्रार करावी लागली, असे समजते आहे. संघातील वातावरण चांगले रहावे आणि सर्व खेळाडूंचा कर्णधाराने सन्मान ठेवावा, असेच अश्विनला यावेळी वाटत होते.Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: