नांदेड जिल्ह्यातील ‘या’ मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा; लढत तिरंगी होणार!


हायलाइट्स:

  • देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा
  • निवडणुकीसंदर्भात प्रक्रिया सुरू
  • नांदेडचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांची माहिती

नांदेड : जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची (Deglur Assembly Bypoll) घोषणा करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मंगळवारपासून निवडणुकीसंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असून आचारसंहिता संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू असणार आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या आकस्मिक निधनानंतर देगलूर बिलोली मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. ३० ऑक्टोबर रोजी या जागेसाठी मतदान होणार आहे. ही जागा जिंकण्यासाठी कॉग्रेस आणि भाजपने कंबर कसली आहे. काँग्रेसकडून जितेश अंतपुरकर यांच्या नावाची चर्चा आहे, तर भाजपाकडून मारोती वाडेकर यांचं नाव सध्या तरी आघाडीवर आहे.

Hasan Mushrif: ग्रामविकास विभागात १५०० कोटींचा घोटाळा?; मुश्रीफांचे सोमय्यांना आव्हान

दुसरीकडे, शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे देखील मतदारसंघात निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. यामुळे देगलूर बिलोली मतदारसंघाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेचा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याने लढत तिरंगी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमकी बाजी कोण मारणार, याकडे राज्याचं लक्ष असणार आहे.

दरम्यान, सभा आणि रॅली काढण्यासाठी प्रशासनाकडून करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: