jignesh mewani : काँग्रेसच्या मंचावर येऊनही जिग्नेश मेवाणींनी पक्षात प्रवेश का केला नाही? दिले स्पष्टीकरण


नवी दिल्लीः गुजरातचे अपक्ष आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी ( jignesh mewani ) मंगळवारी काँग्रेसच्या व्यासपीठावर हजर झाले आणि त्यांनी पक्षाकडून निवडणूक लढवण्याची घोषणाही केली. पण मेवाणी यांनी अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही. कन्हया कुमार यांनी मात्र काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ‘काही तांत्रिक कारणांमुळे औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकत नाही. मी एक अपक्ष आमदार आहे आणि कोणत्याही पक्षात प्रवेश केला तर आमदार राहू शकत नाही, असं मेवाणी यांनी स्पष्ट केलं. यापूर्वी राहुल गांधी कन्हय्या कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांना भेटले.

मी वैचारिकदृष्ट्या काँग्रेसचा एक भाग आहे आणि गुजरातची आगामी निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावर लढणार आहे. जी कहाणी गुजरातपासून सुरू झाली, त्या कहाणीने देशभरात खळबळ उडवून दिली. या विचाराशी जुळलं पाहिजे, असं मला मनापासून वाटतंय. पण मी अपक्ष आमदार असल्याने तांत्रिकदृष्ट्या सध्या पक्षात सहभागी होऊ शकत नाही. मात्र, लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र लढू, असं जिग्नेश मेवाणी म्हणाले.

आम्हाला जो उत्साह दिसतोय, यावरून खात्री आहे की अनेक जण आमच्या सोबत येतील. आम्ही काँग्रेसशी जोडण्याचं काम करू. लवकरच बेरोजगारी आणि महागाईवर मोठं आंदोलन छेडण्यात येईल. गुजरातमध्ये आपण, हार्दिक आणि इतर अनेकजण लढतील. गेल्या वेळी ८-१० जागांचे अंतर होते. पण यावेळी आम्ही तसं होऊ देणार नाही, असा दावा मेवाणी यांनी केला.

kanhaiya kumar : काँग्रेसमध्ये प्रवेश करताच कन्हय्या कुमारांचा PM मोदी आणि RSS वर निशाणा; म्हणाले…

जिग्नेश मेवाणी यांच्या माध्यमातून गुजरातमधील दलित मतदारांना आकर्षित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. गुजरातमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. गुजरातमध्ये ७ टक्के दलित आहेत. यापूर्वी पाटीदार नेता हार्दिक पटेल आणि ओबीसी चेहरा असलेल्या अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

navjot singh sidhu : नवज्योत सिंग सिद्धूंनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा का दिला?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: