पराभवाचा दुष्काळ संपवत मुंबई इंडियन्सने मारली बाजी, पंजाबवर साकारला धडाकेबाज विजय
पंजाबच्या संघाला यावेळी प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पंजाबच्या संघाने सावध सुरुवात केली असली तर कृणाल पंड्याने यावेळी मुंबईला पहिले यश मिळवून दिले. कृणालने यावेळी मनदीप सिंगला बाद केले, त्याला १५ धावा करता आल्या. मनदीप बाद झाल्यावर ख्रिस गेल आणि लोकेश राहुल ही भन्नाट जोडी मैदानात होती, पण त्यावेळी कायन पोलार्ड मुंबईच्या मदतीसाठी धावून आला. पोलार्डने पहिल्यांदाच गेलला बाद केले, त्याला फक्त एकच धाव करता आली. गेलनंतर राहुललाही पोलार्डने बाद केले आणि पंजाबला मोठा धक्का दिला. राहुलला यावेळी २१ धावा करता आल्या. ख्रिस गेल आणि राहुलसारखे महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतरही पंजाबला धावफलक हलता राहीला. कारण यावेळी एडन मार्करमने दमदार फलंदाजी करत पंजाबसाठी चांगल्या धावा जमवल्या. पण मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू राहुल चहरने त्याला बाद केले आणि मुंबईला मोठे यश मिळवून दिले. मार्करमने यावेळी २९ चेंडूंत सहा चौकारांच्या जोरावर ४१ धावांची दमदार खेळी साकारली. त्यामुळे पंजाबला मुंबईपुढे १३६ धावांचे आव्हान ठेवता आहे. पण ट्वेन्टी-२० क्रिकेटचा विचार करता हे आव्हान मोठे वाटत नव्हते.