amarinder singh : पंजाब काँग्रेसमध्ये बंड! अमरिंदर सिंग-अमित शहांच्या भेटीच्या चर्चेने दिल्लीत राजकीय भूकंप?
अमरिंदर सिंग हे आज संध्याकाळी ४.३० वाजता दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे. अमरिंदर सिंग हे अमित शहांची भेट घेणार असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जातंय. अमरिंदर सिंग हे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेणार असल्याचं बोललं जातंय. अमित शहा आणि अमरिंदर सिंग यांच्या संभाव्य भेटीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील भाजप मुख्यालयात हालचालींना वेग आला आहे.
अमरिंदर सिंग यांच्या दिल्ली भेटीबाबत वेगवगेळ्या चर्चा सुरू आहेत. पण ते वैयक्तीक दौऱ्यावर जात आहेत. आपल्या मित्रांच्या भेटी घेणार आहे. तसंच पंजाबच्या नव्या मुख्यमंत्र्यांसाठी ते कपूरथला हाऊस रिकामे करणार आहेत. यामुळे कुठलेही तर्कवितर्क लावू नका, असं अमरिंदर सिंग यांचे माध्यम सल्लागार रवीन ठूकराल यांनी ट्विट करून स्पष्ट केलं आहे.
Kanhaiya Kumar: कन्हय्या कुमार यांची काँग्रेस एन्टी, मनिष तिवारींचा आपल्याच पक्षावर निशाणा
अमरिंदर सिंग यांना हटवून पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचे निवकटवर्तीय चरणजीत सिंग चन्नी यांना काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री केलं. यानंतर अमरिंदर सिंग हे काँग्रेस हायकमांडवर आणि पक्षाच्या निर्णयावर प्रचंड नाराज आहेत. त्यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर टीका करत त्यांना अनुभव नसल्याचं म्हटलं होतं.
BREAKING: नवज्योत सिंह सिद्धूंचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
गृहमंत्री अमित शहा आणि अमरिंदर सिंग यांच्यात यापूर्वीही भेट झाली आहे. पण मुख्यमंत्रीपदावरून हटवल्याने नाराज असलेल्या अमरिंदर सिंग यांच्या या संभाव्य भेटीने दिल्लीत राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.