KKR vs DC IPL 2021: दिल्लीच्या दिग्गजांना कोलकाताने फक्त १२७ धावांवर रोखले


शारजाह: आयपीएलच्या १४व्या हंगामातील ४१व्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १२७ धावा केल्या. केकेआरच्या गोलंदजांनी शानदार कामगिरी करत दिल्लीला फक्त १२७ धावांवर रोखले.

वाचा- हिटमॅन रोहित टी-२० मधील मोठ्या विक्रमाची संधी; कोणत्याही भारतीयाला जमले नाही

केकेआरचा कर्णधार इयान मॉर्गनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकला नाही. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ सलामीला आला. पण दिल्लीला चांगली सुरुवात मिळाली नाही. चांगल्या फॉममध्ये असलेला शिखर धवन २४ धावांवर बाद झाला. त्याच्या जागी आलेला श्रेयस अय्यरला फक्त १ धाव करत आली. २ बाद ४० अशी धावसंख्या असताना कर्णधार पंतने स्मिथसोबत चांगली भागिदारी केली. पण कोलकाताच्या गोलंदाजांनी ही भागिदारी मोठी होऊ दिली नाही. स्मिथला लॉकी फग्यूसनने ३९ धावांवर बाद केले. त्यापाठोपाठ हेटमायर ४ धावांवर माघारी परतला. तर ललित यादव आणि त्या पाठोपाठ अक्षर पटेल हे दोघे शून्यावर बाद झाले. यामुळे दिल्लीची अवस्था ६ बाद ९२ अशी झाली.

वाचा- सामना सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्सला बसला आणखी एक धक्का; पाहा काय झाले

फलंदाजीसाठी अश्विन मैदानात आला त्याने पंत सोबत २४ धावा जोडल्या आणि तो देखील माघारी परतला. पंतला ३९ धावांवर धावबाद करून कोलकाताने अखेरचा अडथळा दुरू केला. दिल्लीला २० षटकात ९ बाद १२७ धाव करता आल्या. कोलकाताकडून फग्युसन, सुनिल नारायण आणि वेंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी दोन तर पदार्पण करणाऱ्या टीम साऊदीने एक विकेट घेतली.

वाचा- IPLमुळे सलून मालक झाला कोट्यधीश, चेन्नई v कोलकाता सामन्यात पाहा काय केलेSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: