Chhagan Bhujbal: भुजबळ-कांदे वाद, अंडरवर्ल्डची एंट्री आणि भुजबळांनी दिले ‘हे’ आदेश


हायलाइट्स:

  • छगन भुजबळ-सुहास कांदे वादात अंडरवर्ल्डची एंट्री.
  • पालकमंत्री म्हणून भुजबळांनी घेतली गंभीर दखल.
  • दोषींवर कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांना आदेश.

मुंबई: महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाचे आमदार सुहास कांदे यांना धमकी मिळाल्याचे पत्र त्यांनी नाशिक पोलीस आयुक्तांना दिले आहे. त्याबाबत माहिती घेऊन नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आमदार सुहास कांदे यांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण गंभीर असून तात्काळ दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले आहेत. ( Suhas Kande Vs Chhagan Bhujbal Latest News )

वाचा:भुजबळ-कांदे वादाला वेगळे वळण; छोटा राजन टोळीकडून धमकी आल्याचा कांदेंचा दावा

आमदार सुहास कांदे यांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण अतिशय गंभीर असून मंत्रिमंडळ बैठक सुरू असतानाच याबाबत माहिती मिळाली आणि आपण ही माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारे कोणत्याही लोकप्रतिनिधीला धमकी देण्याचे प्रकार राज्य सरकार सहन करणार नसल्याचे मत देखील भुजबळ यांनी व्यक्त केले.

वाचा:मुश्रीफांचा १५०० कोटींचा तिसरा घोटाळा!; सोमय्यांचा आरोप, फिर्यादही दिली

कांदे यांनी भुजबळांवर केला आहे आरोप

नांदगावमधील पूरस्थितीबाबत झालेल्या बैठकीत निधीवरून पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. त्यानंतर जिल्हा नियोजन मंडळाच्या कामांच्या वाटपात नांदगावचा निधी अन्यत्र वळविण्यात आल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला होता. पालकमंत्री भुजबळ यांनी निधीचा विनियोग नीट केलेला नाही, असे कांदे यांचे म्हणणे होते. कोट्यवधींच्या कामांचा निधी परस्पर कंत्राटदारांना दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. जिल्हा नियोजन मंडळाच्या कामांच्या वाटपात नांदगावचा निधी अन्यत्र वळविण्यात आल्याप्रकरणी आमदार कांदे यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. या प्रकरणी सुनावणी होण्यापूर्वी या वादाला कांदे यांच्या दाव्यामुळे वेगळे वळण लागले आहे. कांदे यांनी नाशिकचे पोलिस आयुक्त यांना पत्र देत आपल्याला अभय निकाळजे या व्यक्तीने एका मोबाइलवरून फोन करत, हा खटला मागे घ्या अन्यथा आमच्याशी गाठ आहे, अशी धमकी दिल्याचा दावा केला आहे. संबंधिताने आपण छोटा राजन टोळीकडून बोलत असल्याचेही कांदेंना सांगितले. याचिका मागे घेतली नाही तर, तुमच्या कुटुंबीयांचे चांगले होणार नाही, असा इशारा दिल्याचा दावा कांदे यांनी पत्रात केला आहे. थेट छोटा राजन टोळीकडून धमकी आल्याने आपण व्यथित झालो आहोत. या धमकीमुळे माझ्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी संबंधितांची चौकशी करून योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी कांदे यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे. यापूर्वीही मला इंडोनेशियावरून धमकीचा फोन आला होता. मी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, अभय निकाळजे याचा धमकीचा फोन आल्यानंतर मी त्याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे, असे कांदे यांनी सांगितले.

वाचा: सोमय्यांचं पुढचं टार्गेट जरंडेश्वर कारखाना; ठाकरे सरकार व पवारांना दिलं आव्हान



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: