IPLमुळे सलून मालक झाला कोट्यधीश, चेन्नई v कोलकाता सामन्यात पाहा काय केले


मधुबनी: आयपीएलचा १४वा हंगाम युएईमध्ये सुरू आहे. स्पर्धेतील आठ संघ प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. यामुळेच लढती देखील रंगतदार आणि अखेरच्या षटकारपर्यंत होत आहेत. गेल्या रविवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील लढत देखील अशीच चुरशीची झाली. अखेरच्या चेंडूवर चेन्नईने विजय मिळवला. या विजयाने ते गुणतक्त्यात अव्वल स्थानावर गेले तर इकडे भारतात एक जण कोट्यधीश झाला.

वाचा- हिटमॅन रोहित टी-२० मधील मोठ्या विक्रमाची संधी; कोणत्याही भारतीयाला जमले नाही

आयपीएलमध्ये सामना सुरू होण्याच्या आधी संघ निवडा आणि कोट्यवधी रुपये मिळवा अशी जाहीरात अनेक फॅटसी कंपन्या करत असता. अशा स्पर्धेत भाग घेऊन काही रक्कम मिळवणारे मित्र मैत्रीण तुम्ही पाहिले असतील. या ड्रीम टीममध्ये संघ निवडून एक सलून चालक कोट्यधीश झालाय.

वाचा- मोठा निर्णय; दिग्गज खेळाडूची IPL संघातून हकालपट्टी

बिहारमधील मधुबनीतील अंधराठाढी येथील नरौर चौकात सलून चालवणाऱ्या अशोक यांना कधी वाटले देखील नव्हते की त्यांनी निवडलेल्या संघामुळे पैशांचा पाऊस पडले. रविवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या लढती आधी अशोक यांनी ड्रीम टीम निवडली होती. त्यांनी निवडलेल्या संघातील सर्वच खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी केल्याने अशोक यांना १ कोटी रुपयांचे बक्षिस मिळाले.

अशोक यांनी ५० रुपये खर्च करून ११ जणांचा संघ निवडला होता. सामना झाल्यानंतर त्यांना कंपनीकडून १ कोटी रुपये जिंकल्याचा फोन आला. या बक्षिसाच्या रक्कमेतून ३० टक्के कर कापून त्यांना ७० लाख रुपये मिळणार आहेत.

वाचा-सामना सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्सला बसला आणखी एक धक्का; पाहा काय झाले

ननौर चौकातील लहन सलून हेच अशोक यांच्या उत्पन्नाचे साधन आहे. १ कोटी जिंकल्याचे कळताच त्यांना प्रचंड आनंद झाला. या पैशातून ते घर बांधणार असून डोक्यावरील कर्ज फेडणार आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: