कच्च्या तेलाने गाठला तीन वर्षांचा उच्चांक; पेट्रोल- डिझेलबाबत कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय


हायलाइट्स:

  • तीन वर्षांत पहिल्यांदाच तेलाचा बभव ८० डॉलर प्रती बॅरल इतका वाढला आहे.
  • मंगळवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ केली होती,
  • आज बुधवारी कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले आहेत.

मुंबई : कच्च्या तेलाचा भाव ८० डॉलरवर गेल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांसाठी आयात महागली आहे. तीन वर्षांत पहिल्यांदाच तेलाचा बभव ८० डॉलर प्रती बॅरल इतका वाढला आहे. मंगळवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ केल्यानंतर आज बुधवारी इंधन दर स्थिर ठेवले आहेत.

मायक्रोसॉफ्ट, अॅपलमध्ये गुंतवणूक संधी; आयसीआयसीआय प्रु. नॅसडॅक १०० इंडेक्स फंड खुला
जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलातील तेजी कायम आहे. मंगळवारी अमेरिकन बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ८०.६९ डॉलर प्रती बॅरल इतका वाढला आहे. आॅक्टोबर २०१८ नंतर हा सर्वाधिक दर आहे. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ७५.४३ डॉलर झाला. त्यात १.४९ डॉलरची वाढ झाली. युरोपात तेलाची मागणी वाढली असून पुरवठा मात्र मर्यादित आहे. त्यामुळे नजीकच्या काळात तेलाचा भाव आणखी वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

डिजिटल करन्सीच्या किमती घसरल्या ; तब्बल दीड लाख रुपयांनी स्वस्त झाला बिटकॉइन
दरम्यान, आज बुधवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर आहेत. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.४७ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.३९ रुपये झाला आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.१५ रुपये इतका वाढला आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.८७ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.८३ रुपयांपर्यंत वाढला आहे. बंगळुरात पेट्रोल १०४.९० रुपये झाले आहे.

सोने-चांदी गडगडले ; सहा महिन्यांतील सर्वात कमी दरात मिळतंय सोने, जाणून घ्या भाव
आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९७.२१ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत डिझेल ८९.५७ रुपये आहे. चेन्नईत ९४.१७ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.६७ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.४३ रुपये असून बंगळुरात डिझेल ९५.०५ रुपये आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: