स्वत:ला पैगंबर म्हणणाऱ्या मु्ख्याध्यापिकेला मृत्यूदंडाची शिक्षा


लाहोर : ईशनिदेंच्या आरोपाखाली मुख्याध्यापिकेला पाकिस्तानच्या न्यायालयाने मृत्यूदंड व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सलमा तनवीर असे या मुख्याध्यापिकेचे नाव आहे. पैगंबर मोहम्मद यांना इस्लामचे अंतिम पैगंबर मानण्यास नकार देत सलमा यांनी स्वत:च पैगंबर असल्याचे म्हटले होते.

हा ईशनिंदेचा प्रकार असल्याने त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे, असे आपल्या आदेशात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मंसूर अहमद यांनी स्पष्ट केले. एका स्थानिक मौलवीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी २०१३ मध्ये सलमा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. सलमा यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे न्यायालयाने लक्षात घ्यावे, असा युक्तिवाद वकील मोहम्मद रमजान यांनी केला. मात्र हा युक्तिवाद खोडून काढत सरकारी वकिलांनी ‘पंजाब इस्टिट्युट ऑफ मेंटल हेल्थ’चा रिपोर्ट दाखवून खटला चालविण्यासाठी सलमा फिट असल्याचे न्यायालयात सिद्ध केले.

पाकिस्तानमध्ये १२ दहशतवादी संघटनांना आश्रय; पाच संघटनांकडून भारतविरोधी कारवाया

काबूल विद्यापीठात महिलांना बंदी; तालिबान नियुक्त कुलपतीचा आदेश

आतापर्यंत ईशनिंदेचे १,४७२ आरोपी

१९८७ पासून ईशनिंदेच्या कायद्यान्वये १,४७२ आरोपींना शिक्षा देण्यात आली आहे. पाकिस्तानात ईशनिंदा कायदा व त्यानुसार देण्यात येणारी शिक्षा याबद्दल वाद आहे. ईशनिंदेचा आरोप असलेल्यांना आवडीनुसार वकीलही मिळत नाही. या कायद्यान्वये गुन्हे दाखल असलेल्यांचा खटला लढण्यास वकीलच मिळत नाहीत. माजी हुकूमशहा जनरल जिया उल हक यांनी या कायद्यात बदल केल्यानंतर शिक्षा व दंड अधिक कठोर झाले आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: