Pakistani Terrorist: केवळ ५० हजारांसाठी दहशतवादी बनला अली बाबर, कॅमेऱ्यासमोर कबुली


हायलाइट्स:

  • भारतीय सुरक्षादलाच्या हाती लागलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याच्या तोंडून कबुलनामा
  • पाकिस्तानी सेनेकडून मिळालं दहशतवादाचं ट्रेनिंग
  • पाकिस्तानी सेनेकडे आणि आयएसआयकडे बाबरनं मागितली मदत
  • पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमधून ताब्यात घेण्यात आलेल्या पाकिस्तानी दहशतवादी अली बाबर यानं दिलेल्या जबाबातून पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. भारतात २०१६ साली उरीमध्ये घडवून आणण्यात आलेल्या उरी दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच आणखीन एक हल्ला घडवून आणण्यासाठीच इतर साथीदारांसोबत भारतात धाडण्यात आल्याचं बाबरनं म्हटलंय. यासाठी आपल्याला पाकिस्तानी सेनेकडून ट्रेनिंग देण्यात आल्याचंही या दहशतवाद्यानं कबूल केलंय. बाबरच्या म्हणण्यानुसार, नऊ दहशतवाद्यांना पाकिस्ताननं तीन आठवड्यांची ट्रेनिंग दिली होती.

‘लष्कर ए तोयबा’त सामील होण्यासाठी आयएसआयकडून २० हजार देण्यात आले होते. तसंच आणखी ३० हजार रुपये देण्यात येतील, असं आश्वासनही दिलं होतं. एका कारखान्यात काम करत असताना आयएसआय आणि ‘लष्कर’शी संबंधित एका दहशतवाद्याशी ओळख झाली होती. लष्कर ए तोयबाकडून अनाथ आणि गरीब मुलांना जिहादसाठी तयार केलं जातं, असंही बाबरनं आपल्या कबुलनाम्यात म्हटलंय.

‘मी पाकिस्तानी सेना आणि आयएसआयला विनंती करतो की मला परत बोलावलं जावं. भारतीय सेनेकडून मला चांगली वागणूक देण्यात आली. माझ्यावर कोणतेही अत्याचार करण्यात आले नाहीत’, असं या दहशतवाद्यानं म्हणत पाकिस्तानकडे मदतीची याचना केलीय.

तीन महिन्यांच्या ट्रेनिंग दरम्यान इस्लामला धोका आहे, काश्मीरमध्ये लोकांवर अत्याचार केले जातात, असं सांगून जिहादसाठी चिथावण्यात आल्याचंही बाबरनं कबूल केलंय. अली बाबर पात्रा असं त्याचं नाव आहे. ‘लष्कर ए तोयबा’मध्ये दाखल झालेल्या केवळ १९ वर्षीय अली बाबर पात्रा याला मुजफ्फराबादमध्ये दहशतवादाचं ट्रेनिंग देण्यात आलं होतं.

भारतीय सेनेचे अधिकारी मेजर जनरल वीरेंद्र वत्स यांनी काल पत्रकार परिषद घेऊन याबद्दल सविस्तर माहिती दिली होती. १८ सप्टेंबर रोजी वास्तविक नियंत्रण रेषेवर घुसखोरीच्या हालचाली दिसून आल्यानंतर एका मोहिमेला हाती घेण्यात आली होती. सुरूवात करण्यात आली होती. एकून सहा दहशतवादी भारतीय हद्दीत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय सैन्यानं केलेल्या गोळीबारानंतर चार पाकिस्तानात पळून गेले. तर दोन दहशतवादी २५ सप्टेंबर रोजी एका नाल्यात लपून बसले होते. यातील एक चकमकीत ठार झाला तर दुसऱ्या दहशतवाद्यानं – बाबरनं भारतीय सेनेपुढे हत्यारं टाकत शरणागती पत्करली. यानंतर बाबरला ताब्यात घेण्यात आलं. तो पाकिस्तान हद्दीतील पंजाबच्या ओकारा प्रांताचा रहिवासी आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: