सोने सावरले तर चांदीवर दबाव कायम ; जाणून घ्या सोने-चांदीचा आजचा भाव


हायलाइट्स:

  • आज बुधवारी सोन्याचा भाव वधारला असला तरी चांदीमध्ये घसरण सुरुच आहे.
  • सोने १७० रुपयांनी महागले तर चांदीमध्ये ४०० रुपयांची घसरण झाली.
  • सोने दरात मंगळवारी १४९ रुपयांची घसरण झाली होती.

मुंबई : कमॉडिटी बाजारात सुरु आलेल्या नफावसुलीला आज ब्रेक लागला आहे. आज बुधवारी सोन्याचा भाव वधारला असला तरी चांदीमध्ये घसरण सुरुच आहे. सोने १७० रुपयांनी महागले तर चांदीमध्ये ४०० रुपयांची घसरण झाली.

कच्च्या तेलाने गाठला तीन वर्षांचा उच्चांक; पेट्रोल- डिझेलबाबत कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय
सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४६०६५ रुपये आहे. त्यात १०९ रुपयांची वाढ झाली आहे. तत्पूर्वी सोन्याचा भाव ४६१२६ रुपयांपर्यंत वाढला होता. एक किलो चांदीचा भाव ६००५९ रुपये आहे. त्यात ४०५ रुपयांची घसरण झाली. त्याआधी चांदीने ५९९०५ रुपयांची नीच्चांकी पातळी गाठली.

सेन्सेक्स -निफ्टीत मोठी पडझड ; सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांना बसला शॉक
Goodreturns या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५१०० रुपये इतका आहे. २४ कॅरेटचा भाव ४६१०० रुपये झाला. आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५३५० रुपयांवर स्थिर आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४९४८० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४३५०० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७४६० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५५५० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८२५० रुपयांवर स्थिर आहे.

रिअल इस्टेट गुंतवणूक संधी; ‘महिंद्रा मनुलाईफ’चा आशिया पॅसिफिक रिट फंड ऑफ फंड्स खुला
जागतिक कमॉडिटी बाजारात स्पॉट गोल्ड ०.१ टक्क्यांहून अधिक घसरून प्रति औंस १७४७.९९ डॉलरपर्यंत खाली आले आहे. दुसऱ्या बाजूला चांदीमध्ये मात्र तेजी दिसून आली. चांदीचा भाव ०.६ टक्क्यांनी वधारून २२.५५ डॉलर प्रती औंस झाला.

ऑक्टोबरपासून ATM सेवा बंद; या बँंकेने घेतला निर्णय, हे आहे त्यामागचे कारण
याआधी सोमवारी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली होती. एमसीएक्सवर बाजार बंद होताना सोन्याचा भाव पुन्हा ४६०७१ वर स्थिरावला. त्यात ७६ रुपयांची वाढ झाली. तर चांदी ६५० रुपयांनी वधारून ६०६०५ रुपयांवर बंद झाली. तर मंगळवारी सोने दरात १४९ रुपयांची घसरण झाली होती. सोन्याचा भाव ४५९२० रुपयांपर्यंत खाली घसरला होता. मागील सहा महिन्यातील सोन्याचा हा नीचांकी स्तर गाठला होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: