भारतीय संघात उभी फूट; अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने उचलले टोकाचे पाऊल, बीसीसीआयला म्हटले…


नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्याची घोषणा केली, आणि जसं दिसत आहे तसं नाहीय याची जाणीव झाली. आता हळूहळू अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे. जे संघात फूट पडण्याच्या कारणांकडे बोट करत आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर अनेक माजी खेळाडूंनी विराट कोहलीविरोधात तक्रारींचा पाढा वाचण्यास सुरवात केली होती. न्यू इंडियन एक्स्प्रेसने विश्वसनीय स्त्रोतांद्वारे असेच आणखी एक वृत्त दिले आहे की, भारतीय संघातील दोन वरिष्ठ खेळाडूंनी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडे विराट कोहलीच्या वर्तनाबद्दल तक्रार केली होती. या अहवालात विराट कोहलीने चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना फटकारल्याचाही उल्लेख आहे.

अहवालानुसार, “जून महिन्यात टीम इंडिया इंग्लंडला पोहोचेपर्यंत परिस्थिती चांगली होती, पण त्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाने सर्व काही बदलून टाकले. साऊथम्प्टन येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया विजयाची प्रबळ दावेदार होती, पण फलंदाजीतील अपयशामुळे भारताला या कसोटीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. फलंदाजी अपयशी ठरल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आणि कर्णधार कोहलीने संघाच्या वरिष्ठ फलंदाजांना यासाठी जबाबदार धरले. जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम पराभवानंतर आयोजित पत्रकार परिषदेत तो म्हणाला होता की, “धावा काढण्याची आणि धावा करण्याचे मार्ग शोधण्याची मानसिकता संघातील खेळाडूंकडे असावी. तुम्ही बाद होण्याची जास्त काळजी करू शकत नाही. यामुळे तुम्ही गोलंदाजाला स्वतःवर वर्चस्व गाजवण्याची संधी देता.”

डब्ल्यूटीसी फायनलनंतर संघातील वातावरण तापले
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डब्ल्यूटीसी फायनलमध्ये फलंदाजांच्या अपयशानंतर विराट कोहलीने ड्रेसिंग रूममध्ये पुजारा आणि रहाणे या दोघांविरोधात नाराजी व्यक्त केली होती. विराटने पुजाराच्या संथ स्ट्राइक रेटवर प्रश्न उपस्थित केले आणि रहाणेच्या खराब फॉर्मवर निशाणा साधला होता. संघाच्या आत घडलेल्या या गोष्टी एका मोठ्या समस्येमध्ये बदलण्यास वेळ लागला नाही. डब्ल्यूटीसी फायनलनंतर जेव्हा टीम इंडिया दोन आठवड्यांच्या ब्रेकवर होती, त्याच वेळी दोन्ही वरिष्ठ फलंदाजांनी बीसीसीआयच्या सचिवांना वैयक्तिक कॉल केला, त्यानंतर बीसीसीआयला या प्रकरणाची नोंद घ्यावी लागली.

एकदिवसीय संघाचे कर्णधारपद कोहलीच्या हातातून जाणार
पुजारा आणि रहाणे यांच्या फोन कॉलनंतर, बीसीसीआयने संघातील इतर खेळाडूंकडून अभिप्राय देखील घेतला आणि इंग्लंड दौऱ्याच्या अखेरीस त्यावर काही कारवाई केली जाईल असे ठरवले. कोहलीने कामाचा ताण असल्याने आपण टी-२० कर्णधारपद सोडत असल्याचे कारण सांगितले आहे, पण असे मानले जाते की, टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर बीसीसीआय त्याच्याकडील एकदिवसीय कर्णधारपदाबाबतही निर्णय घेऊ शकते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: