Statue Of Sharad Pawar: पुण्यात साकारला शरद पवार यांचा चित्तवेधक पुतळा; महिला शिल्पकाराची कमाल


हायलाइट्स:

  • पुण्यात साकारण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा पूर्णाकृती पुतळा.
  • महिला शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी हा पुतळा तयार केला आहे.
  • शरद पवार यांचा हा पुतळा धातूचा असून त्याची उंची ९ फुटांची आहे.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा पूर्णाकृती पुतळा पुण्यात साकारण्यात आला आहे. महिला शिल्पकार सुप्रिया शिंदे (Supriya Shinde) यांनी हा पुतळा तयार केला आहे. शरद पवार यांचा हा पुतळा धातूचा असून त्याची उंची ९ फुटांची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या पुतळ्याची पाहणी केली. हा पुतळा हुबेहुब साकारण्यात आला असून पवार यांचे शिल्प चित्तवेधक असल्याचे त्या म्हणाल्या. (a fascinating statue of sharad pawar has been erected in pune mp supriya sule visited workshop)

शरद पवार यांच्या पुतळ्यासाठी दीड टन धातूचा वापर करण्यात आला आहे. शिल्पकार सुप्रिया शिंदे यांना हा पुतळा साकार करण्यासाठी ८ महिन्यांचा कालावधी लागला. हा पुतळा साकारण्यासाठी शिंदे या दररोज १० तास काम करत होत्या.

क्लिक करा आणि वाचा- ‘शेतकऱ्यांनी धीर सोडू नये’; पूरस्थितीबाबत मुख्यमत्र्यांचे प्रशानाला ‘हे’ आदेश

खासदार सुप्रिया सुळे यांनी २७ सप्टेंबर या दिवशी शिंदे यांच्या वर्कशॉपला भेट दिली. या वर्कशॉपमधील विविध शिल्प पाहून सुप्रिया सुळे अचंबित झाल्या. त्यांनी येथील शिल्पांचे फोटो ट्विट करत माहिती दिली. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, पुणे येथील सुप्रिया शेखर शिंदे या शिल्पकार तरुणीच्या वर्कशॉपला भेट दिली. या वर्कशॉपमध्ये सुप्रिया करीत असलेले काम थक्क करणारे आहे. येथे त्यांनी राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि बालशिवाजी यांचे देखणे शिल्प साकारले आहे. याशिवाय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे शिल्पही चित्तवेधक आहे.’

क्लिक करा आणि वाचा- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना बसला पुराचा मोठा फटका; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि बालशिवाजी यांचेही साकारले शिल्प

शिल्पकार सुप्रिया सुळे यांनी आतापर्यंत अनेक शिल्प साकारली आहेत. त्यांच्या वर्कशॉपमध्ये असलेले राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि बालशिवाजी यांचे शिल्प लक्ष वेधून घेतात.

शरद पवार यांचा पुतळा बनवण्यासाठी शिल्पकार शिंदे यांनी पवार यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओंचा अभ्यास केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- मोफत शिवभोजन थाळी होतेय बंद! १ ऑक्टोबरपासून मोजावे लागणार पैसेSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: