Family Found Dead: तीन मुलांना विष पाजून आई-वडिलांची आत्महत्या


हायलाइट्स:

  • एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळले
  • मंगळवारी रात्री पती-पत्नीत जोरदार भांडण
  • बुधवारी सकाळी आढळून आले मृतदेह
  • रागाच्या भरात आत्मघाती पाऊल उचलल्याची शक्यता

पलवल, हरयाणा : हरयाणाच्या पलवल जिल्ह्यात एक धक्कादायक आणि तितकीच दुर्दैवी घटना समोर येतेय. पलवलमधील औरंगाबाद गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.

आपल्या तीन मुलांना विषारी पदार्थ चारल्यानंतर संबंधित पती-पत्नीनं आत्महत्या करून आपलं जीवन संपवल्याचं प्राथमिकदृष्ट्या समोर येतंय. स्थानिकांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी पाचही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

Pakistani Terrorist: केवळ ५० हजारांसाठी दहशतवादी बनला अली बाबर, कॅमेऱ्यासमोर कबुली
Murder Mystery: आंतरराष्ट्रीय बायकरचा मृत्यू : सामान्य मृत्यू नाही तर हत्या, तीन वर्षानंतर खुलासा
शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पती आणि पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं होतं. या भांडणानंतर रागाच्या भरात या कुटुंबानं आत्मघाती पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय. दुर्दैव म्हणजे, स्वत: विष घेण्यापूर्वी या जोडप्यानं आपल्या तीन मुलांनाही विषारी पदार्थ खाऊ घातले.

औरंगाबादचा रहिवासी असलेला ३५ वर्षीय नरेश आपल्या सासुरवाडी झाशीला एक छोटं हॉटेल चालवत होता. मंगळवारी सकाळी ११.०० वाजता तो झासीहून आपल्या गावात दाखल झाला होता. बुधवारी सकाळी नरेशच्या वडील लखीराम यांना नरेशचा मृतदेह पंख्याला लोंबकळलेल्या अवस्थेत आढळला. नरेशची पत्नी तसंच १३ वर्षांची मोठी मुलगी आणि ११ वर्षांची दुसरी मुलगी आणि १२ वर्षीय मुलगा वेगवेगळ्या ठिकाणी मृतावस्थेत पडलेले दिसले. नरेशच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबाला आर्थिक समस्या नव्हत्या. परंतु, मुलानं हे पाऊल का उचललं याचं उत्तर मात्र त्यांच्याकडेही नव्हतं.

बुधवारी सकाळी गावकऱ्यांना एकाच कुटुंबातील पाच मृतदेह आढळल्यानं त्यांना मोठा धक्का बसला. पोलीस नातेवाईक तसंच शेजाऱ्यांकडून अधिक माहिती घेत आहेत.

Shahid Amrish Tyagi: जन्मानंतर १६ वर्षांनी पहिल्यांदाच मुलीनं पाहिला शहीद पित्याचा मृतदेह
India China: चिनी सैनी उत्तराखंडात घुसले… पूल उद्ध्वस्त केला आणि निघून गेले!Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: