ऑक्टोबरपासून ATM सेवा बंद; या बँंकेने घेतला निर्णय, हे आहे त्यामागचे कारण


हायलाइट्स:

  • सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने त्यांची एटीएम सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला.
  • डिजिटल बँकिंग इनिशिएटिव्ह प्रोग्रॅममुळे १ ऑक्टोबर २०२१ पासून एटीएम बँकिंग सेवा बंद करणार
  • बँकेने २३ जानेवारी २०१७ पासून लघु वित्त बँक म्हणून कामकाज सुरू केले होते.

नवी दिल्ली : सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने त्यांची एटीएम सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. डिजिटल बँकिंग इनिशिएटिव्ह प्रोग्रॅममुळे १ ऑक्टोबर २०२१ पासून एटीएम बँकिंग सेवा बंद करण्याचा निर्णय बँकेने मंगळवारी (२८ सप्टेंबर) जाहीर केला. बँकेने २३ जानेवारी २०१७ पासून लघु वित्त बँक म्हणून कामकाज सुरू केले होते.

डिजिटल करन्सीच्या किमती घसरल्या ; तब्बल दीड लाख रुपयांनी स्वस्त झाला बिटकॉइन
पैशांचा व्यवहार कसा होणार?
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात असलेल्या बँकेचे एटीएम आणि डेबिट कार्ड इतर बँकेच्या एटीएममध्ये कार्यरत राहील. याशिवाय इतर सेवा जसं की पिन जनरेशन, फंड ट्रान्सफर, मिनी स्टेटमेंट, बॅलन्स इन्क्वायरी इत्यादी इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगद्वारे या सेवा उपलब्ध असतील.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता; जाणून घ्या ‘नाॅमिनेशन’चे महत्व आणि उपयुक्तता
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकिंग नियमन अधिनियम, १९४९ च्या कलम २२ (१) अन्वये भारतातील लघु वित्त बँकांचा व्यवसाय चालवण्यासाठी परवाना जारी केला होता. या अंतर्गत सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक कार्यरत होती.

दोन लाख कोटींचा चुराडा ; चौफेर विक्रीने शेअर बाजारात मोठी पडझड
बँक पुरवते या सेवा
जेव्हा आरबीआयने नोव्हेंबरमध्ये अशी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, तेव्हा असे म्हटले होते की, लहान वित्त बँका पायाभूत बँकिंग सेवा देतील, ठेवी स्वीकारतील आणि अनारक्षित आणि अल्पभूधारक संस्था, ज्यात लहान व्यवसाय, छोटे शेतकरी, सूक्ष्म आणि लघु उद्योग आणि असंघटित क्षेत्रातील संस्था कर्ज देतील. तसेच वंचित वर्गांनादेखील कर्ज देईल.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचे एफडी दर
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या वेबसाइटनुसार, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ७ दिवस ते १० वर्षांच्या ठेवींवर ३.२५ टक्के ते ६.७५ टक्के व्याज देते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: