एकही सामना न खेळता अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या संघातून बाहेर, पाहा कोणाला मिळाली संधी…


नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सच्या संघातून सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन हा बाहेर पडला आहे. अर्जुनच्या जागी एका नव्या खेळाडूला मुंबई इंडियन्सच्या संघात स्थान दिलं आहे.
नेमकं घडलं तरी काय, पाहा…
मुंबई इंडियन्सच्या संघाने अर्जुनला या मोसमात तब्बल २० लाख रुपये एवढी बेस प्राइज देत संघात घेतले होते. पण अजूनही अर्जुनला एकही सामना मुंबई इंडियन्सने खेळायला दिला नव्हता. पण एकही सामना न खेळता आता अर्जुन मुंबई इंडियन्सच्या संघाच्या बाहेर गेला आहे. अर्जुनला दुखापत झाली आहे, त्यामुळे त्याला संघाबाहेर जावे लागणार आहे. अर्जुनच्या जागी आता मुंबई इंडियन्सच्या संघात सिमरजित सिंगला संधी दिली आहे.

या आयपीएमध्ये अर्जुनला नेमकी कधी संधी मिळणार, याची उत्सुकता चाहत्यांना होता. अर्जुन जेव्हा आयपीएलच्या लिलावाला उपलब्ध झाला होता, तेव्हा त्याला कोणत्या संघात स्थान मिळेल, याबाबतही उत्सुकता होती. पण मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या संघात दाखल करून घेतले. त्यानंतर अर्जुन आणि सचिन तेंडुलकर हे दोघेही सोशल मीडियावर ट्रोल झालेले पाहायला मिळाले होते. त्यानंतर अर्जुन आता मैदानात कधी उतरणार आणि कशी कामगिरी करणार, याकडे सर्वांचे डोळे लागलेले होते. अर्जुन हा बऱ्याचदा संघाबरोबर सराव करत असल्याचे पाहायला मिळत होते. पण आतापर्यंत एकही संधी त्याला दिली नव्हती.

मुंबई इंडियन्सच्या संघाबरोबर सराव करत असताना अर्जुनला गंभीर दुखापत झाली होती. सुरुवातीला त्याच्यावर उपचार केले गेले, पण ही दुखापत लवकर बली होईल असेल दिसत नव्हते. त्यामुळे यावर्षीच्या आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय आता अर्जुनने घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सने याबाबतची माहिती ट्विट करत दिली आहे. दुखापतीमुळे अर्जून या आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही आणि त्याच्याजागी सिमरजीत सिंगला संघात स्थान देण्यात आले आहे. सिमरजित सिंग हा एक युवा वेगवान गोलंदाज आहे, स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळेच मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या संघात दाखल करून घेतले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: