amarinder singh : काँग्रेसला हादरा! कॅप्टन अमरिंदर सिंग अमित शहांच्या भेटीसाठी निवासस्थानी दाखल


नवी दिल्लीः पंजाब काँग्रेसमध्ये राजकीय कलह रंगला असताना दुसरीकडे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठी निघाले आहेत. अमरिंदर सिंग हे मंगळवारीच अमित शहांना भेटणार होते, पण नवज्योत सिंग सिद्धूंच्या राजीनाम्यानंतर झालेल्या गोंधळादरम्यान ते गेले नाहीत. आपण कोणालाही भेटणार नाही, असं त्यांनी काल सांगितलं होतं. पण आता ते कॅप्टन अमरिंदर सिंग हे अमित शहांना भेटणार आहेत. या भेटीनंतर कॅप्टन अमरिंदर सिंग हे काँग्रेसचा राजीनामा देण्याची दाट शक्यता आहे.

अमरिंदर सिंग हे लवकरच काँग्रेस सोडून भाजपमध्ये जातील, अशी दिल्लीत जोरदार चर्चा आहे. त्यांना राज्यसभेचे खासदार बनवून केंद्रात मोठे मंत्रालय दिले जाईल, असंही बोललं जात आहे. अमरिंदर सिंग यांना केंद्रीय कृषी मंत्री बनवलं जाण्याची दाट शक्यता आहे. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. पंजाब, हरयाणा आणि पश्चिम यूपीतील जाट शेतकऱ्यांचा कायद्यांना विरोध आहे.

amarinder singh : पंजाब काँग्रेसमध्ये खळबळ; सिद्धूंचा राजीनामा, अमरिंदर सिंग दिल्लीत दाखल

charanjit singh channi : ‘सिद्धूंशी मी फोनवर बोललो, आम्ही मिळून मतभेद दूर…’

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या अनुभवाचा योग्य उपयोग करण्यासाठी पक्षाची रणनीती सुरू आहे. त्यांना पक्षात प्रवेश देऊन एक चेहरा म्हणून समोर आणले जाईल. किंवा अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वात एखादा पक्षही स्थापन केला जाऊ शकतो. त्या पक्षाला भाजप बाहेरून पाठिंबा देईल. या शक्यतांवर भाजपकडून गांभीर्याने विचार सुरू असल्याचं पक्षातील सूत्रांनी सांगितलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: