nitesh rane vs sanjay raut: पंजाबमध्ये सिद्धू, तसे महाराष्ट्रात संजय राऊत: नितेश राणेंचा टोला


मुंबई: गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election)मुद्द्यावरून भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. संजय राऊत (Sanjay Raut) जिथे जिथे जातात तिथे तिथे आमची सत्ता येते. बेळगावमध्ये काय झाले?, असे सांगत आज मी देवाचे आभार मानले की त्यांच्यावर अशीच जबाबदारी दे. याचे कारण म्हणजे राऊत हे सगळीकडे जाऊन फक्त शिवसेना संपवण्याचे काम करत आहे, अशी शब्दात राणे यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. (bjp mla nitesh rane criticizes shiv sena mp sanjay raut on goa election)

क्लिक करा आणि वाचा- पुण्यात साकारला शरद पवार यांचा चित्तवेधक पुतळा; महिला शिल्पकाराची कमाल

‘गोव्यातील विकासाबाबत राऊत यांना आदित्य ठाकरेंना विचारावे’

खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडताना आमदार नितेश राणे यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनाही टोला लगावला आहे. गोव्यात किती विकास झाला हे संजय राऊत यांना जर जाणून घ्यायचे असेल, तर त्यांनी आदित्य ठाकरे यांना विचारावे. कारण गोव्याचा किती छान विकास झालाय, हे आदित्य ठाकरे यांना चांगले माहीत आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘शेतकऱ्यांनी धीर सोडू नये’; पूरस्थितीबाबत मुख्यमत्र्यांचे प्रशानाला ‘हे’ आदेश

‘संजय राऊतांमुळे गोव्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार’

संजय राऊत यांचे गोव्याला पाय लागले आहेत. यामुळे आता गोव्यात आमचा मुख्यमंत्री बसणार हे माझे ठाम मत आहे. पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धू आणि आणि महाराष्ट्रात संजय राऊत हे एकाच तालमीत बसणारे लोक आहेत. पंजाबमध्ये ज्या प्रमाणे सिद्धू काँग्रेस पक्षाला संपवण्याचे काम करत आहेत, तसेच काम महाराष्ट्रात संजय राऊत करत आहेत, असे टीकास्त्र सोडतानाच संजय राऊत हे भाजपसाठी पोषक काम करत आहेत, असेही राणे यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना बसला पुराचा मोठा फटका; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: