कान्हापुरी ते पंढरपूर येथील मुक्कामी एसटी तात्काळ सुरू करावी यासाठी निवेदन

कान्हापुरी ते पंढरपूर येथील मुक्कामी एसटी तात्काळ सुरू करावी यासाठी निवेदन

पंढरपूर – कान्हापुरी तालुका पंढरपूर या मार्गाची बंद असलेल्या एसटी च्या फेऱ्या तात्काळ सुरू करण्यात याव्यात तसेच गावातील व इतर गावातील शेतकऱ्यांना दैनंदिन व्यवहार व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी सतत ये-जा करावी लागते. या कोरोनाच्या काळात बंद झालेली मुक्कामी व सकाळच्या वेळीतील एस.टी तात्काळ सुरू करण्यात यावी अशी बळीराजा शेतकरी संघटनेने मागणी केली आहे .

  पंढरपूर आगार प्रमुख श्री सुतार यांना निवेदन देण्यात आले आणि त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी एसटी सुरू करतो असे आश्वासन दिले. या वेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर,जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत नलवडे , बळीराजा शेतकरी संघटनेचे पंढरपुर संपर्कप्रमुख रणजित शिंदे,उमाजी खिलारे,अनिल कोळेकर, औदुंबर सुतार,विशाल नलवडे,सुभाष शेंडगे, कृष्णा नलावडेंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: