yogi adityanath : यूपीत पुन्हा कमळ फुलणार! आगामी निवडणुकीत भाजप ३२५ – ३५० जागा जिंकणार?


लखनऊः उत्तर प्रदेशची आगामी विधानसभा निवडणूक सत्ताधारी भाजप सहज जिंकेल. भाजप २०१७ च्या तुलनेत अधिक जागा जिंकेल. २०१७ मध्ये भाजपने ३१२ जागा जिंकल्या होत्या. पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभानिवडणुकीत भाजप ३२५ ते ३५० जागा जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. सुशासन, आर्थिक विकास आणि कायदा-सुव्यवस्थेवर सरकारने मोठं काम केलं आहे, असा दावा योगींनी केला.

सुशासन आणि सरकारने केलेली कामे आणि जातीय समीकरणांमुळे जनतेतील नकारात्मकतेवर मात करण्यात यश येईल, असा विश्वास आदित्यनाथ यांनी व्यक्त केला. आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही पुन्हा सत्तेत येऊ. गेल्या २३ वर्षांपासून आपण उत्तर प्रदेशच्या राजकारणात आहोत. यामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणं आपण जाणून आहोत. उत्तर प्रदेशातील मतदारांच्या राजकीय समज आणि परिपक्वतेवर आपल्याला विश्वास आह, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाचा २६ सप्टेंबरला विस्तार झाला. यात ७ नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. मंत्रिमंडळात सामाजिक समतोल आणि सर्व समाजांचे प्रतिनिधित्व आहे, असं मुख्यमंत्री योगी म्हणाले. तसंच केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात भारतीय किसान युनियन आणि राकेश टिकैत यांच्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा फटका पश्चिम युपीत पक्षाला निवडणुकीत बसणार नाही, असा दावा मुख्यमंत्री योगींनी केला. पश्चिम युपीचा भाग हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.

शेतकरी आंदोलनाला विरोधी पक्षांकडून निधी पुरवला जातोय. पण या आंदोलनाचा परिणाम हा ज्या राज्यांमध्ये दलाल आणि अडते आहेत, त्यांना बसणार आहे. उत्तर प्रदेशातील शेतकरी थेट सरकारच्या संपर्कात आहे. यामुळे सरकारची खरेदी थेट शेतकऱ्यांकडून होत असून त्यांना त्यांना भरपाईही थेट मिळत आहे. विरोधकांकडे आता कुठलेही मुद्दे नाहीत. यामुळे विरोधक हे तथाकथित शेतकरी आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा घणाघात मुख्यमंत्री योगींनी विरोधकांवर केला.

पश्चिम यूपीत जाट बहुल भागात शेतकरी आंदोलनाचा फटका भाजपला बसू शकतो, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. पश्चिम यूपीतील जाट शेतकऱ्यांचा या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं बोललं जातंय.

भगवी वस्त्र घातली म्हणून योगीला धर्माच्या मर्यादा कशा काय घालू शकता? पूजाविधी करणं हा आपला अधिकार आहे. पण त्याचबरोबर आपला देश आणि समाजासाठी काम करणं ही माझी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासून मी हे काम करत आलो आहे. फरक इतकाच आहे की माझे कार्यक्षेत्र वाढले आहे. हे एक टीमवर्क आहे आणि मी स्वतःला कधीच प्रोजेक्ट केले नाही, असं मुख्यमंत्री योगींनी सांगितलं. हिंदुस्थान टाइम्स त्यांनी मुलाखत दिलीय.

charanjit singh channi : ‘सिद्धूंशी मी फोनवर बोललो, आम्ही मिळून मतभेद दूर…’

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विरोधकांनी जनतेतील विश्वास गमवला आहे. राज्यातील राजकीय गुंतागुंत आणि सतत बदणारी जातीय समीकरणे यामुळे आपण कुठलीही संधी चुकवत नाही. मंत्रिमंडळ विस्तारातून हे स्पष्ट होत असल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली.

Shahid Amrish Tyagi: जन्मानंतर १६ वर्षांनी पहिल्यांदाच मुलीनं पाहिला शहीद पित्याचा मृतदेह



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: