amarinder singh : अमित शहा-अमरिंदर सिंग भेटीवरून संतप्त झालेली काँग्रेस काय-काय बोलली?
अमित शहा आणि पंतप्रधान मोदी पंजाबवरून सूडाच्या आगीत जळत आहेत. त्यांना पंजाबचा सूड घ्यायचा आहे. कारण शेतकरीविरोधी काळ्या कायद्यांद्वारे आपल्या भांडवलदारांचे हित साधण्यात ते अपयशी ठरले आहेत. भाजपचे शेतकरी विरोधी षडयंत्र यशस्वी होणार नाही, असं रणदीप सुरजेवाला म्हणाले. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी १८ सप्टेंबरला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर काँग्रेसने दलित नेते चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला. यानंतर चन्नी यांनी २० सप्टेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
पंजाबमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. यामुळे अरिंदर सिंग आणि अमित शहांच्या भेटीवरून राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. पुढील काळात अमरिंदर सिंग हे भाजपमध्ये प्रवेश करतील असं बोललं जातंय. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने अशी शक्यता व्यक्त केली आहे. केंद्र सरकार नवे कृषी कायदे मागे घेणार की नाही? यावर सर्वकाही अवलंबून असल्याचं एका सूत्राने सांगितलं.
navjot singh sidhu : सिद्धूंमुळे झाली फजिती! संतप्त काँग्रेस हायकमांडने दिला इशारा
kapil sibal : ‘पक्षात निर्णय कोण घेतंय हेच कळत नाहीए’, सिब्बल काँग्रेस हायकमांडवर बरसले
अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत पंजाबमधील सुरक्षेवर चर्चा केली, असं अमरिंदर सिंग यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितलं. तर अमरिंदर सिंग हे पंतप्रधान मोदींचीही भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पण याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अमरिंदर सिंग हे गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांच्यासह ‘ग्रुप २३’मधील काँग्रेसच्या काही नेत्यांचीही भेट घेऊ शकतात, असं सूत्रांनी सांगितलं.