VIDEO: आईने मोबाईल हिसकावून घेतला, १५ वर्षांच्या मुलाचा पारा चढला, अख्खं घर उद्ध्वस्त केलं


नवी दिल्ली: आजकालच्या काळात लहान मुलांना मोबाईलचे इतके व्यसन लागले आहे की, झोपताना, खाताना, पिताना ते फक्त मोबाईलमध्येच गुंतलेले असतात. काही वर्षांपूर्वी लहान मुले घराबाहेर पडून मैदानी खेळ खेळत असत, पण आज त्यांना मोबाईलचे इतके व्यसन लागले आहे की ते खेळतातही मोबाईलवरच. पालकांनी कितीही मनाई केली तरीही मुलं काही ऐकत नाही. यामुळे पालकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकवेळा मुलं मोबाईलसाठी असं काही करुन बसतात की ज्याची कल्पनाही पालकांनी केली नसेल. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे.

आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तर तुम्हीही चक्रावाल. एका महिलेने तिच्या १५ वर्षांच्या मुलाच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला. यानंतर मुलाने जे केले ते पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. क्षणभर तुमचाही विश्वास बसणार नाही की एक १५ वर्षांचा मुलगा असे भयंकर काहीतरी करु शकतो.

हेही वाचा –फक्त १०-१२ बॉल्स खेळविण्यासाठी या खेळाडूला संघात घेऊ नका, गौतम गंभीर स्पष्टच बोलला

व्हिडीओमध्ये दिसणारा हा विध्वंस कोणत्या भुकंपामुळे झालेला नाही आणि ना ही कृत्य कोणत्या चोराचे आहे. तर फक्त १५ वर्षांच्या मुलाने ही घरची अशी अवस्था केली आहे. फोन हिसकावल्याचा मुलाला इतका राग आला की त्याने संपूर्ण घर उद्ध्वस्त केले.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की घराची खोली कशी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. सगळीकडे तोडफोड करण्यात आली आहे. फ्रीज, टीव्हीपासून ते किचन, टेबल, सोफा सर्वकाही उद्ध्वस्त झालेलं आहे.

हेही वाचा –दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, मुंबईतील न्हावा शेवा बंदरावरुन १८०० कोटींचं हेरॉईन जप्त

हा धक्कादायक व्हिडीओ शेअर करताना IPS यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘घरातील हा विध्वंस एका १५ वर्षांच्या मुलामुळे झाला कारण त्याच्या आईने त्याचा मोबाईल घेतला. आजच्या पिढीला मोबाईलचे व्यसन टाळण्यासाठी आणि भावना + एक्शन्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुलांवर संस्कार करणे किती महत्त्वाचे आहे हे दृश्य पाहून स्पष्ट होते.’ हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी स्तब्ध झाले आहेत. काय बोलावं हेच कळत नाहीये. अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा –फायनान्सवर ट्रॅक्टर घेतला, त्याच ट्रॅक्टरवर बसून वसुली एजंटने गर्भवतीला चिरडलं…

महाराष्ट्राच्या तरुणांनी फक्त नाचायचं आणि रोजगार गुजरातला; वरून सरदेसाईंची शिंदे सरकारवर टीकाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: