रोहित शर्माने लाइव्ह सामन्यात केला स्टीव्हन स्मिथला इशारा, व्हिडिओ पाहाल तर हसतच राहाल…


मोहाली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना चांगलाच रंगला. दोन्ही संघांवर यावेळी भरपूर दडपण होते. पण या दडपणामध्येही सामना सुरु असताना रोहित शर्माने अशी एक गोष्ट केली की, सर्वांनाच त्यावेळी हसू आवरता आले नाही. या गोष्टीचा व्हिडिओ सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वात चांगलाच व्हायरल झाला आहे.

नेमकं घडलं तरी काय, पाहा…
ऑस्ट्रेलियाच्या डावातील १२व्या षटकात स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ फलंदाजी करत होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर उमेश यादवने त्याला बाद केले. वास्तविक, स्टीव्ह स्मिथने या षटकात उमेश यादवच्या गोलंदाजीवर विकेटच्या मागे दिनेश कार्तिककडे त्याचा झेल दिला, पण अंपायरने त्याला आऊट दिले नाही. पंचांच्या नॉटआऊट निर्णयावर टीम इंडियाने रिव्ह्यू घेतला आणि चेंडू स्मिथच्या बॅटला लागल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट झाले. त्यानंतरही स्टीव्ह स्मिथ आपण बाद झालो हे स्वीकारण्यास तयार नव्हता. हा प्रसंग पाहून कॅप्टन रोहितने त्याच्याकडे बोट दाखवले आणि हसायला लागला. रोहितच्या या हावभावाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

या सामन्यात स्टीव्ह स्मिथ २४ चेंडूत ३५ धावा करून बाद झाला. या खेळीत स्मिथने ३ चौकार आणि एक षटकार मारला होता. स्टीव्ह स्मिथ बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियन संघाने ११.३ षटकात १२२ धावा केल्या होत्या. स्टीव्ह स्मिथच्या या विकेटचा टीम इंडियाला फायदा झाला नाही कारण टीमला चार विकेट्सनी पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २०८ धावा केल्या होत्या. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक नाबाद ७१ धावा केल्या, तर केएल राहुलने ५५ आणि सूर्यकुमार यादवने ४६ धावा केल्या. भारताच्या २०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने १९.२ षटकांत सहा गडी गमावून हे लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीनने ६१ आणि मॅथ्यू वेडने नाबाद ४५ धावा केल्या. या विजयासह ऑस्ट्रेलियाच्या संघाने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता एक सामान जरी त्यांनी जिंकला तरी त्यांना मालिका जिंकता येणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: