जरा चालवा की आपलं टकूर .. .

  • : जरा चालवा की आपलं टकूर .. .

हजारो मंदिरे अनेक तपस्वी साधुसंत पूजा अर्चा पण कश्मीर अशांत
दहशतवादाचा ज्वालामुखी जागृत
जातीय अस्मिता धर्मांध शक्तीचा उद्रेक
भांडवलदार सुखांत शेतकरी फासावर
कर्मचारी सातव्या वेतन आयोगावर
स्कॅम घोटाळे लज्जास्पद प्रश्न कोठे गेले सारे देव ?
कुठपर्यंत चालवत रहायचे ही दुकाने ?
प्रश्न अस्वस्थ करतो म्हणूनच
म्हणतो सत्याचा शोध केंव्हा घेणार ?

  • : एक वास्तव :

मृत्युच भय सर्वांनाच असतं
पण तो येइतों जगावच लागतं
ते का कोणाच्या हातांत असतं ?

मृत्यू कोठे कसं अन केंव्हा येईल हे
सारे अनिश्चित असतं येई तो कांही खरं नसतं
पण आल्यावर मात्र खरं नसतं !!

म्हणूनच काळजीनें झुरत मरण्यापेक्षा
कर्तुत्व फुलवत जगावं ते महत्वाचे ठरतं !!

यासाठीच माणसाने असं जगावं
की गेल्यावरही आपलं नांव
सर्वांच्या मुखात आदरार्थी निघत रहावं !!

आनंद कोठडीया, जेऊर,९४०४६९२२००

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: