अजनसोंड गावातील निष्कृष्ट कामाची चौकशीची मनसेची मागणी

  • चौकशी न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन

पंढरपूर / प्रतिनिधी – अजनसोंड गावातील पाणीपुरवठा विहरीवरचा मुरूम निष्कृष्ट दर्जाचा टाकलेला असून व कमी क्वांटिटीत टाकलेला असून व गावातील दलित वस्ती मधील गटारीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे .

या सर्व कामाची चौकशी करावी यासाठी पाणीपुरवठा विभागाचे डेप्युटी इंजिनियर श्री पांडे यांना निवेदन देण्यात आले.30/09/2022 तारखेपर्यंत न चौकशी झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल,असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी दिला आहे.

यावेळी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष अनिल बागल , विद्यार्थी सेना तालुका सचिव शुभम काकडे, तेजस गांजाळे यांच्यासह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: