श्री विठ्ठल मंदिर सभामंडपात संत सेना महाराजांचे तैलचित्र लावा -राष्ट्रीय नाभिक संघटना

श्री विठ्ठल मंदिर सभामंडपात संत सेना महाराजांचे तैलचित्र लावा
राष्ट्रीय नाभिक संघटनेची मागणी


पंढरपूर – महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या मंदिरातील सभा मंडपात विविध संतांचे  तैलचित्र लावण्यात आलेले आहे. मात्र या ठिकाणी नाभिक समाजाचे थोर श्री संत सेना महाराज यांचे तैलचित्र लावण्यात आलेले नाही यासाठी राष्ट्रीय नाभिक संघटनेच्यावतीने श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांना रितसर निवेदन देवून संत सेना महाराज यांचे तैलचित्र लावण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी सुमंगल पतसंस्थेचे चेअरमन बबनराव शेटे, राष्ट्रीय नाभिक संघटनेचे शहराध्यक्ष तुकाराम चव्हाण, विजय भोसले, प्रमोद लाडगावकर, महेश माने, दत्ता काळे, चंद्रकांत खंडागळे, अंकुश भोसले, विठ्ठल भोसले, श्री खंडागळे, दत्ता देवकर, गुरू राऊत, मनोज गावटे यांच्यासह नाभिक समाज बांधव उपस्थित होते. 

यावेळी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी मंदिर समितीच्या मिटींगमध्ये सदरचा प्रस्ताव ठेवून श्री संत सेना महाराज यांचे तैलचित्र बसविण्याचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: