लायन्स क्लबच्या वतीने जुळे सोलापूर भागात मोफत सुवर्ण बिंदू प्राशन केंद्र सुरू

  • लायन्स क्लबच्या वतीने जुळे सोलापूर भागात मोफत सुवर्ण बिंदू प्राशन केंद्र सुरू

सोलापूर – लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी च्या वतीने डाॅ.एम.एस. स्वामी आणि डॉ.शिवानी एम. स्वामी यांच्या सहकार्याने आभाश्री क्लिनिक द्वारका नगरी विजापूर रोड येथे दर महिन्याच्या पुष्य नक्षत्र दिवशी मोफत सुवर्ण बिंदू प्राशन या कायमस्वरूपी प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कायमस्वरूपी प्रकल्पाचे उद्घाटन उपप्रांतपाल-2 ला. ॲड. एम.के.पाटील , क्लब अध्यक्ष लायन इंजि.सागर पुकळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. उद्घाटना नंतर पहिल्याच वेळेस 82 जणांनी या सुविधेचा लाभ घेतला.

आपल्या प्रास्ताविकात बोलताना सागर पुकाळे म्हणाले की ,सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलाच्या आरोग्याबाबत चिंता वाटत आहे. त्याची रोगप्रतिकारक शक्ती आणि बुद्धी वाढावी यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करीत आहे. काश्यप ऋषींनी हजारो वर्षापूर्वी आयुर्वेदात सांगितले आहे की सुवर्ण बिंदू प्राशन यासाठी आवश्यक आहे. ही काळाची गरज लक्षात घेऊन आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे.

उद्घाटन भाषणात बोलताना ला.अॕड. एम के पाटील सर म्हणाले की लायन्स क्लब ऑफ सोलापूर ट्विन सिटी ने ह्या वर्षी मोठी भरारी घेतली असून ह्या चालू वर्षातील तीन महिन्या मध्येच चिल्ड्रन पार्क, व्हिजन सेंटर व त्यानंतर ही मोफत सुवर्ण बिंदू प्राशन केंद्र अशी तीनही समाजोपयोगी परमनंट ऍक्टिव्हिटी कौतुकास्पद आहे. सागर पुकाळे यांचे सतत काही ना काही नवीन संकल्पना राबवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सागर पुकाळे अध्यक्ष असलेला सह क्लब करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे.

यावेळेस सचिव इंजि.रविकिरण वायचळ, खजिनदार राजेश परसगोंड,ममता बुगडे, नागेश बुगडे,ज्ञानेश्वर कुलकर्णी,भाऊसाहेब माने , आभाश्री क्लिनिकचे डॉ.एम.एस. स्वामी, डॉ. शिवानी स्वामी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: