शिखर धवनने शेअर केला संतापजनक घटनेचा व्हिडिओ; कबड्डी खेळाडूंना शौचालयात दिले जेवण?


मुंबई:सहारनपूर येथील डॉ. भीमराव स्पोर्ट्स स्टेडियम येथे १६ सप्टेंबरपासून तीन दिवसीय सब-ज्युनियर मुलींच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत १७ संघांनी भाग घेतला. स्पर्धेच्या पहिल्या दिवसाची एक विचित्र घटना घडली. टॉयलेटमध्ये शिजवलेले अन्न त्यांना दिले जात असल्याचा दावा खेळाडूंनी केला. जेवणात फक्त भाज्या आणि कोशिंबीर दिल्याचेही खेळाडूंनी सांगितले. या सर्व प्रकारचा व्हीडीओ सोशल मिडियवर चांगलाच व्हायरल झाला आहे. तर संबंधित प्रकरणाची चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

सहारनपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत खेळाडूंना शौचालयात ठेवलेले जेवण देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याने ती घटना “अत्यंत लज्जास्पद” असल्याचे म्हटले आहे. त्याने या घटनेबाबत ट्विट करत लिहिले की, राज्यस्तरीय स्पर्धेत कबड्डीपटूंना टॉयलेटमध्ये जेवताना पाहणे खूप निराशाजनक आहे. या घटनेची चौकशी करून त्यावर आवश्यक ती कारवाई करावी ही विनंती.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव कोच द्रविड यांच्या जिव्हारी लागला; टी-२० वर्ल्डकपसाठी BCCIकडे केली ही मागणी

कबड्डी महासंघाकडून टाळाटाळ

दुसरीकडे, सहारनपूरच्या भीमराव आंबेडकर स्टेडियमवर झालेल्या मुलींच्या सब-ज्युनियर कबड्डी स्पर्धेत टॉयलेटमध्ये ठेवलेले अन्न खेळाडूंना खाऊ घातल्याच्या घटनेची अ‍ॅमेच्योर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाने (एकेएफआय) बुधवारी टाळाटाळ केली आणि म्हटले की, राष्ट्रीय संस्थेचा या स्पर्धेच्या आयोजनात कोणत्याही प्रकारे सहभाग नव्हता.

या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर, उत्तर प्रदेश सरकारने हलगर्जीपणासाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याला निलंबित केले आणि अन्न पुरविणाऱ्या कंत्राटदाराला ‘ब्लॅक लिस्ट’ मध्ये टाकले. दिल्ली उच्च न्यायालयाने नियुक्त केलेले एकेएफआय प्रशासक एसपी गर्ग म्हणाले, “या असोसिएशनची सदर स्पर्धेत कोणतीही भूमिका नाही. ही पूर्णपणे उत्तर प्रदेश सरकारशी संबंधित स्पर्धा आहे. त्यांनी (आयोजकांनी) स्वतः सर्व व्यवस्था केली होती.

टी 20 वर्ल्डकप साठी काहीही! द्रविडच्या एका शब्दावर बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

राष्ट्रीय महासंघाच्या मान्यतेशिवाय राज्यस्तरीय स्पर्धा कशी होऊ शकते, असे विचारले असता ते म्हणाले की, ‘आम्ही कोणत्याही प्रकारे स्पर्धेच्या आयोजनात सहभागी नाही. आम्हाला काही लेणं देणं नाही. आमच्याकडे या स्पर्धेची कोणतीही माहिती नाही. उत्तर प्रदेश कबड्डी असोसिएशनचे सचिव राजेश कुमार सिंग यांनी सांगितले की, या स्पर्धेला एकेएफआय किंवा इतर कोणत्याही राज्य युनिटने अधिकृतपणे मान्यता दिली नाही. या स्पर्धेचा वार्षिक ‘कॅलेंडर’ मध्ये समावेश करण्यात आला नव्हता.

राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. आमची भूमिका केवळ तांत्रिक मदत देण्याची होती. आम्ही काही अधिकारी आणि निवड समितीला स्पर्धेच्या आयोजनासाठी पाठवले होते, याशिवाय दुसरे काही नाही. ओपन चॅम्पियनशिपसारख्या आमच्या स्वतःच्या राज्यस्तरीय स्पर्धा आहेत. ही स्पर्धा (सहरनपूरमध्ये १६ वर्षांखालील मुलींची स्पर्धा) आमच्या वार्षिक ‘कॅलेंडर’मध्ये समाविष्ट नव्हती. राज्य सरकार यावर कठोर कारवाई करत असून चौकशी समिती स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १६ वर्षांखालील विभागातील प्रत्येक खेळाडूचा जबाब नोंदवून घेणार आहेत.

भारताच्या पराभवावर सुनील गावस्कर जाम भडकले, रोहित आणि द्रविडवर साधला निशाणा

टॉयलेटमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एडीएम-फायनान्सने तपासात खेळाडूंचे जबाब घेतले. तपासात जबानी देण्यासाठी आलेल्या राधिका, पारुल, राधा या तिन्ही खेळाडूंनी टॉयलेटमध्ये ठेवलेले जेवण निराधार असल्याचे सांगत, टॉयलेटमध्ये ठेवलेले जेवण दिले जात नव्हते, त्यांनी बाहेर ठेवलेले जेवण खाल्ले होते. आतमध्ये खराब भात ठेवला होता. त्यांना काही लोकांनी असे करण्यास सांगितले, त्यानंतर त्याने आतमध्ये खराब झालेले तांदूळ उचलले, त्याचा एक व्हिडिओ बनवून व्हायरल केला. प्रशासनाने त्यांच्या चौकशीत त्यांचे जबाब नोंदवले आहेत. एडीएम फायनान्स रजनीश मिश्रा यांनी सांगितले की, जबाब नोंदवण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात हे आरोप निराधार असल्याचे आढळून आले.

टी-२० वर्ल्डकपच्या आधी होणार भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच; वाचा कधी, कुठे आणि केव्हा

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये टॉयलेटमध्ये भात आणि पुरी दिसत आहेत. यावर क्रीडा अधिकारी अनिमेश सक्सेना सांगतात की, जे तांदूळ बनवण्यासाठी आले होते ते खराब झाले होते, त्यामुळे ते खराब झालेले तांदूळ टॉयलेटच्या बाहेरील भागात ठेवण्यात आले होते, मात्र तिथे ठेवलेले जेवण कोणालाही दिले जात नव्हते. याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. डीएम अखिलेश सिंह यांनी सांगितले की, एडीएम रजनीश मिश्रा तपास अहवाल सादर करतील. त्याआधारे पुढील कार्यवाही केली जाईल. तर त्या क्रीडा अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: