अदानी सुसाट! दररोज केली १६०० कोटींची कमाई, जाणून घ्या अंबानीपेक्षा किती पटीने अधिक आहे श्रीमंती


नवी दिल्ली : भारतीय उद्योगपती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी एकापाठोपाठ एक यशाची पायरी चढत आहेत. यापूर्वी, अदानी जगातील पहिल्या १० अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले होते, तर आता त्यांनी हुरून इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. या यादीत रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

अदानींच्या संपत्तीत झपाट्याने वाढ
बुधवारी जाहीर झालेल्या IIFL वेल्थ हुरुन इंडिया श्रीमंत लिस्ट २०२२ नुसार, गौतम अदानी १०,९४,४०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह अव्वल स्थानावर आहेत. याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी ७,९४,७०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह हुरुनच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर, एलन मस्क आणि अदानींमध्ये किती अंतर?
एका वर्षात नेटवर्थ किती वाढली?
गेल्या वर्षभरात गौतम अदानी यांच्या मालमत्तेत मोठी झेप घेतली आहे. या कालावधीत त्यांची एकूण संपत्ती ५,८८,५०० कोटी रुपयांनी वाढली आहे. अशा परिस्थितीत जर आपण अब्जाधीश गौतम अदानींच्या रोजच्या कमाईचा हिशोब केला तर त्यांनी दररोज सुमारे १,६१२ कोटी रुपये खिशात घातले आहेत. दुसरकडे, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीच्या तुलनेत अदानी त्यांच्यापेक्षा ३ लाख कोटी रुपयांनी श्रीमंत आहेत.

अदानींसाठी मोठी धोक्याची घंटा; कर्ज इतक्या हजार कोटींनी वाढलं
वर्ष २०२२ वर अदानींचे वर्चस्व
यादी लाँच करताना हुरुन इंडियाचे एमडी आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद म्हणाले की, २०२२ हे वर्ष कमाईच्या बाबतीत गौतम अदानींच्या लक्षात राहील. आपल्या व्यवसायाला नवी उंची देत त्यांनी कमाईच्या बाबतीत जगातील सर्वात मोठ्या अब्जाधीशांनाही मागे टाकले आहे. अदानी समूहाच्या शेअर बाजारात सूचिबद्ध झालेल्या ७ कंपन्यांचे मार्केट कॅप १ लाख कोटी रुपये आहे.

पहिले १० श्रीमंत भारतीय कोण?
हुरुन इंडियाच्या ११व्या वार्षिक रँकिंग अहवालात ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत श्रीमंतांच्या संपत्तीची गणना करण्यात आली आहे. गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्याशिवाय सायरस एस पूनावाला या यादीत तिसऱ्या स्थानावर असून त्यांची एकूण संपत्ती २,०५,४०० कोटी रुपये आहे. याशिवाय शिव नाडर १,८५,८०० कोटींच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर, तर राधाकिशन दमानी यांनी १,७५,१०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह पाचवे स्थान काबीज केले आहे.

टाटाही सांभाळू शकले नाही जी कंपनी आता त्याला अदानींची पुढची पिढी तारणार
याशिवाय २०२२ च्या यादीत अनेक नवीन नावांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये फार्मा टायकून दिलीप सांघवी आणि बँकिंग मॅग्नेट उदय कोटक यांचा समावेश आहे, जे पहिल्या १० मध्ये अनुक्रमे ९व्या आणि १०व्या क्रमांकावर आहेत.

यादीत १,१०३ लोकांना स्थान
यादीनुसार यामध्ये सर्वात तरुण श्रीमंत १९ वर्षीय कैवल्य वोहरा आहे, जो डिलिव्हरी स्टार्टअप झेप्टोचा सह-संस्थापक आहे. यावरून स्टार्टअप्स भारतात कमाईच्या बाबतीत किती प्रगती करत असल्याचे स्पष्ट चित्र दिसते. हुरुन इंडिया रिच श्रीमंत २०२२ मध्ये देशातील १२२ शहरांमधील १,००० कोटी रुपयांची संपत्ती असलेल्या १,१०३ लोकांना या यादीत स्थान देण्यात आले आहे. या यादीतील क्षेत्रनिहाय वाढ पाहता फार्मा हे आघाडीचे क्षेत्र बनले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: