भारतीय क्रिकेट संघाच्या सामन्यावर मोठं संकट, मॅच खेळवण्यासाठी लाईटचं नाही


तिरूवअनंतपुरम: भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियानंतर या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. पहिली टी-२० मालिका आफ्रिकेविरुद्ध खेळली जाईल, ज्याचा पहिला सामना २८ सप्टेंबर रोजी तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाईल. पण या ही टी-२० मालिका खेळवली जाणार की नाही, यावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

तिरुवनंतपुरममध्ये होणार्‍या या सामन्यात मोठे संकट उभे ठाकले आहे. ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमच्या (Greenfield International Stadium) वीज बिलाच्या थकबाकीमुळे स्टेडियमचे वीज कनेक्शन खंडित करण्यात आले आहे.

शिखर धवनने शेअर केला संतापजनक घटनेचा व्हिडिओ; कबड्डी खेळाडूंना शौचालयात दिले जेवण?

वीज पुरवठा नसल्यास कसा होणार सामना….

केरळ राज्य प्रशासनाने अडीच कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी असल्याने स्टेडियमचा वीजपुरवठा खंडित केला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने सामना इतर कोणत्या स्टेडीयमवर हलवला जाणार का, अशी भीती चाहत्यांना वाटू लागली आहे. पण याबाबत केरळ क्रिकेट असोसिएशनच्या (Kerala Cricket Association KCA) एका अधिकाऱ्याने क्रिकबझला सांगितले की, हा सामना कोणत्याही परिस्थितीत खेळवला जाईल. मग सामना खेळवण्यासाठी मग जनरेटरचा वापर करावा लागला तरी चालेल. या सामन्यासाठी जनरेटरचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव कोच द्रविड यांच्या जिव्हारी लागला; टी-२० वर्ल्डकपसाठी BCCIकडे

केसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘वीज असो वा नसो, कोणत्याही परिस्थितीत जनरेटरच्या मदतीने सामना खेळवला जाईल. ही आंतरराष्ट्रीय खेळाची पद्धत आहे, कारण कोणताही सामना राज्याच्या वीज पुरवठ्यावर अवलंबून नसतो. सामन्याच्या आधी आणि इतर तयारीसाठी विजेची गरज असते. त्यासाठी बॅकअप तयार करण्यात आला आहे. जनरेटरचा वापर करण्यात येईल. आम्हाला सामना इथे खेळवायचा आहे आणि तो होणारच.

टी 20 वर्ल्डकप साठी काहीही! द्रविडच्या एका शब्दावर बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

वीज बिल भरले आहे : केएसएफएल

केरळच्या वीज मंडळाने स्टेडियमचे वीज कनेक्शन खंडित केले आहे, कारण त्यावर अडीच कोटी रुपयांहून अधिकचे बिल आले आहे. त्याच वेळी, ग्रीनफील्ड स्टेडियम केरळ स्पोर्ट्स फॅसिलिटी लिमिटेड (KSFL) च्या मालकीचे आहे. त्यांनी वीज बिल भरल्याचे सांगितले आहे.

केएसएफएलचे अधिकारी कृष्ण प्रसाद म्हणाले, ‘येथे एक थिएटर आणि एक सभागृह आहे. त्याचे वीज बिल थकीत आहे. त्याचा आमच्याशी काही संबंध नाही. मग आम्ही इतरांची बिले का भरायची?’ आत्तापर्यंत ग्रीनफिल्ड स्टेडियमवर ३ आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. यापैकी भारतीय संघाने दोन सामने जिंकले आहेत, तर एक सामना गमावला आहे.

ऑस्ट्रेलिया संघाचा भारत दौरा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (तीन टी-२० सामन्यांची मालिका)
पहिला टी-२० (२० सप्टेंबर) – मोहाली
दुसरा टी-२० सामना (२३ सप्टेंबर) – नागपूर
तिसरा टी-२० सामना (२५ सप्टेंबर) – हैदराबाद

टी 20 वर्ल्डकप साठी काहीही! द्रविडच्या एका शब्दावर बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

दक्षिण आफ्रिका संघाचा भारत दौरा

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (तीन टी-२० सामन्यांची मालिका)
पहिला टी-२० सामना (२८ सप्टेंबर) – तिरुवनंतपुरम
दुसरा टी-२० सामना (२ ऑक्टोबर) – गुवाहाटी
तिसरा टी-२० सामना (४ ऑक्टोबर) – इंदूर

भारताच्या पराभवावर सुनील गावस्कर जाम भडकले, रोहित आणि द्रविडवर साधला निशाणा

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका)

पहिला एकदिवसीय सामना (६ ऑक्टोबर) – लखनऊ
दुसरा एकदिवसीय सामना (९ ऑक्टोबर) – रांची
तिसरा एकदिवसीय सामना (११ ऑक्टोबर) – दिल्लीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: