Gujarat Riots : गुजरात दंगल प्रकरणी SITचा धक्कादायक दावा, मोदींविरोधात रचला होता मोठा कट


अहमदाबाद : गुजरातमधील २००२ च्या दंगलीत ( Gujarat Riots 2002 ) राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोवण्याचा मोठा कट रचण्यात आला होता. तिस्ता सेटलवाड, माजी आयपीएस संजीव भट्ट आणि आरबी श्रीकुमार यांनी हा कट रचला होता. या तिघांनी मिळून तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी ( Pm Modi News ) यांना तुरुंगात टाकण्यात यावे, अशा पद्धतीने त्यांना गोवायचे होते. विशेष तपास पथकाच्या म्हणजेच एसआयटीने आरोपपत्रातून हा दावा करण्यात आला आहे. हे आरोपपत्र एसआयटीने न्यायालयात दाखल केले आहे. अहमदाबाद सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेले आरोपपत्र १०० पानांचे आहे.

तिस्ता सेटलवाड यांनी खूप खोलवर कट रचला होता. यामध्ये संजीव भट्ट तिस्ताला मदत करत होते, असेही आरोपपत्रात एसआयटीने म्हटले आहे. या बोगस प्रकरणाला भट्ट यांनी हाताळले. खोटी साक्ष न दिल्याने एका व्यक्तीला धमकावण्यात आले. या सर्व गोष्टी एसआयटीने आरोपपत्रात नमूद केल्या आहेत.

पुरावे तयार केल्याप्रकरणी आरोपपत्र

गुजरात दंगलीत क्लीन चिट मिळाल्यानंतर गुजरात पोलिसांनी तिस्ता सेटलवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. काही आठवड्यांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने सेटलवाड यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. एसआयटी या प्रकरणाचा तपास करत होती. सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, निवृत्त पोलीस महासंचालक आरबी श्रीकुमार आणि माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांच्याविरुद्ध पुरावे तयार केल्याप्रकरणी बुधवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले.

माजी आयपीएस राहुल शर्मा साक्षीदार

येथील मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे तपास अधिकारी व सहायक पोलीस आयुक्त बी. व्ही. सोळंकी यांनी सांगितले. माजी आयपीएस अधिकारी ते वकील झालेले राहुल शर्मा यांना या प्रकरणात साक्षीदार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कलम ४६८ (फसवणूक करण्याच्या हेतूने खोटे करणे), १९४ (फसवणूक करण्याच्या हेतूने खोटे पुरावे देणे किंवा बनवणे) आणि २१८ (लोकसेवकाला शिक्षेपासून वाचवण्याच्या हेतूने खोटे रेकॉर्ड तयार करणे किंवा लिहिणे) नुसार आरोप केले करण्यात आले आहेत.

NIA Raid Live: टेरर लिंक प्रकरणी आजवरची सर्वात मोठी कारवाई; NIAचे १२ राज्यात छापे, १०६ जणांना अटक

तिस्ता सेटलवाड यांची अंतरिम जामिनावर सुटका

जूनच्या शेवटच्या आठवड्यात अटक करण्यात आलेल्या सेटलवाड यांना सर्वोच्च न्यायालयाने २ सप्टेंबला अंतरिम जामीन मंजूर केला होता. या प्रकरणी श्रीकुमार तुरुंगात आहेत. भट्ट हा तिसरा आरोपी पालनपूर कारागृहात आहे, जिथे तो १९९० च्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

पंतप्रधान मोदींनी रतन टाटांकडे दिली मोठ्ठी जबाबदारी; ‘विश्वासा’चं पद सोपवलंSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: