क्रिकेटमध्ये २३ वर्षानंतर असे घडले; भारतीय महिला संघाने इंग्लंडमध्ये इतिहास घडवला


कँटेबरी: भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडमध्ये इतिहास घडवला. २३ वर्षानंतर महिलांच्या संघाने इंग्लंडचा त्याच्या घरच्या मैदानावर वनडे मालिकेत पराभव केला. काल बुधवारी झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने विजय मिळवला आणि मालिका देखील जिंकली.

सलग दुसऱ्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर भारतीय महिला संघ गेला आहे. गेल्या वर्षी झालेल्या ३ सामन्यांच्या मालिकेत भारताचा १-२ असा पराभव झाला होता. यावेळी मात्र महिला संघाने बाजी पलटली आणि मालिकेतील पहिल्या दोन लढती जिंकून कमाल केली.

वाचा- जसप्रीत बुमराह कधी खेळणार? ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर आली मोठी अपडेट

दुसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ५ बाद ३३३ धावांचा डोंगर उभा केला होता. उत्तरादाखल इंग्लंडला सर्वबाद २४५ धावा करता आल्या. भारताकडून हरमनप्रीत कौरने १११ चेंडूत नाबाद १४३ धावा केल्या, यात ४ षटकार आणि १८ चौकारांचा समावेश होता. तिने १२८.८३ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. हरमनचे हे वनडेमधील पाचवे शतक ठरले.

वाचा- पराभवानंतर हताश रोहित शर्माने दिला गंभीर इशारा; टी-२० वर्ल्डकपच्या आधी सुधारा नाही तर…

स्मृती मंधानाचा विक्रम

या सामन्यात भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधानाने वनडे क्रिकेटमधील ३ हजार धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारी ती तिसरी भारतीय महिला फलंदाज ठरली. याआधी माजी कर्णधार मिताली राज आणि विद्यमान कर्णधार हरमनप्रीत कौरने अशी कामगिरी केली आहे.

वाचा- शिखर धवनने शेअर केला संतापजनक घटनेचा व्हिडिओ; कबड्डी खेळाडूंना शौचालयात दिले जेवण?

स्मृतीने ही कामगिरी ७६व्या वनडेत केली. तिने मिताली राजचा ८८ डावात ३ हजार धावांचा विक्रम मागे टाकला. महिला क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात हा विक्रम बेलिंडा क्लार्कच्या नावावर आहे. तिने ६२ डावात ही कामगिरी केली आहे. भारतीय पुरुषांच्या क्रिकेटमध्ये शिखर धवनच्या नावावर हा विक्रम आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: