घरभाडे वाढीत मुंबई देशात नंबर वन, आता मोजावे लागणार इतके लाख


नवी दिल्ली: करोना आणि लॉकडाऊनमधून सावरल्यानंतर देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये अचानक भाड्यात वाढ करण्यात आली आहे. अॅनारॉकच्या मते गेल्या दोन वर्षांत देशातील सात प्रमुख शहरांमधील उच्चभ्रू निवासी परिसरांमधील सरासरी मासिक भाडे ८ ते १८ टक्क्यांनी वाढले आहे. तसेच भांडवली मूल्यात २ ते ९ टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

मालमत्ता खरेदीचा विचार करताय, मग लक्षात ठेवा महत्त्वाच्या ५ गोष्टी, पुनर्विक्रीच्या वेळी फायद्यात राहाल
रिअल इस्टेट सल्लागार अॅनारॉकने म्हटले की, दिल्ली-एनसीआर, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR), चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद आणि पुणे अशा सात शहरांमध्ये मालमत्ता खरेदी आणि भाड्याने देण्याची मागणी वाढली आहे. Anarock Data ने या सात शहरांमधील निवडक लक्झरी ठिकाणी २,००० चौरस फूट अपार्टमेंटचे सरासरी मासिक भाडे घेतले आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत CEOने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, किंमत आहे इतके कोटी
मुंबईत सर्वाधिक भाडेवाढ
आकडेवारीनुसार मुंबईतील वरळीमध्ये सर्वाधिक भाडेवाढ झाली आहे. येथे दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०२० मध्ये २,००० चौरस फूट क्षेत्रफळाच्या आलिशान घरांसाठी दरमहा २ लाख भाडे द्यावे लागले. त्याचवेळी आता १८ त्यात टक्के वाढ दिसून झाली असून त्याच मालमत्तेचे भाडे दरमहा २.३५ लाख रुपये झाले आहे. याशिवाय मुंबई महानगर प्रदेशमध्ये (MMR) तारदेव मधील सरासरी मासिक भाडे २.७ लाख रुपयांवरून दोन हजार चौरस फूट क्षेत्रासाठी १५ टक्क्यांनी वाढून ३.१ लाख रुपये झाले. तर भांडवली किमती २०२० मध्ये ४१,८६२ प्रति चौरस फूट वरून केवळ ३ टक्क्यांनी वाढून ४३,००० वर पोहोचले आहे.

जुहूतील भूखंडाची किंमत गगनात, मुंबईत ३३२ कोटींचा विक्री व्यवहार
दुसरीकडे, वरळीमध्ये २,००० स्क्वेअर फूट फ्लॅटसाठी सरासरी भाडे २०२० मध्ये २ लाख प्रति महिना १८ टक्क्यांनी वाढून २.३५ लाख रुपये झाले. तसेच भांडवली मूल्ये देखील दोन टक्क्यांनी वाढून ३८,५६० वरून ३९,३५० प्रति चौरस फूट झाली.

“बहुतेक प्रमुख लक्झरी हाऊसिंग मार्केटमध्ये गेल्या दोन वर्षांत भाड्यात दुप्पट वाढ झाली आहे,” असे Anarock चे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले. तसेच करोना साथीच्या दुसऱ्या लाटेनंतर भाडेकरूंचे प्राधान्य मोठ्या आकाराच्या घरांकडे झुकले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. “कोविडपूर्व, दिलेल्या कालावधीत सरासरी दोन वर्षांच्या लक्झरी भाड्यात वाढ मोठ्या प्रमाणात एक-अंकी होती, जी ५ ते ७ टक्क्यांच्या दरम्यान होती,” ते म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: