रोहित-राहुलच्या हट्टामुळे टीम इंडियाला बसतोय फटका, या प्रयोगांमुळे वर्ल्डकप जिंकणार तरी कसा?


मुंबई: टी-२० क्रिकेटमधील अव्वल संघांपैकी एक असलेला भारतीय संघ गेल्या ४ सामन्यांपैकी ३ सामन्यांमध्ये पराजित झाला आहे. आशिया कपमध्ये यंदा संघाला अंतिम फेरी गाठता आली नाही. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये देखील पराभव पाहावा लागला. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की पुढील विश्वचषकात या संघाकडून कोणतीही आशा नसल्याचे जाणकार आणि चाहते सांगत आहेत. भारतीय संघ कुठे चुकतोय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

आशिया कपमधील सुपर फोरच्या सामन्यात २२ वर्षीय खेळाडू रवी बिश्नोई या गोलंदाजाचा संघात समावेश करण्यात आला होता. बिश्नोईने आपल्याला मिळालेल्या संधीचा योग्य फायद घेत त्याने पाकिस्तानचा फलंदाज कर्णधार बाबर आझम याची विकेट घेतली. त्यानंतर बिश्नोई सामन्यातील महत्त्वाचे १८ वे शतक टाकत असताना अर्शदीप सिंहने झेल न घेतल्याने महत्त्वाचा विकेट गेला. एकंदरीतच बिश्नोईवर सोपवलेली कामगिरी त्याने पार पाडली.

भारतीय क्रिकेट संघाच्या सामन्यावर मोठं संकट, मॅच खेळवण्यासाठी लाईटचं नाही

रवीने १८व्या षटकात केवळ ८ धावा दिल्या. अर्शदीपने झेल पकडला असता तर सामना जिंकता आला असता. संघ व्यवस्थापनाने रवीला पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करायला लावली. त्याने शानदार गोलंदाजी केली, त्याला डेथ ओव्हर टाकण्यास सांगण्यात आले. तिथेही त्याने चांगली कामगिरी केली, पण त्यानंतर पुढच्याच सामन्यात या खेळाडूला अंतिम अकराच्या संघातून वगळण्यात आले.

श्रीलंकेकडे डावखुरे फलंदाज जास्त आहेत, असे म्हटले जात होते, त्यामुळे ऑफस्पिनर आर. अश्विन खेळणार आहे. पाकिस्तानकडे फखर जमान, खुशदिल शाह आणि मोहम्मद नवाज यांच्या रूपाने डावखुरे फलंदाज असले तरी बिश्नोईला संधी मिळाली. आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही बिश्नोई संघाचा भाग नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव कोच द्रविड यांच्या जिव्हारी लागला; टी-२० वर्ल्डकपसाठी BCCIकडे

बिश्नोईसारख्या गोलंदाजाला संघातून वगळले हे एक उदाहरण आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी गेल्या काही महिन्यांत असे अनेक विचित्र प्रयोग केले, असे अनेक निर्णय घेतले, त्‍यामुळे आतापर्यंत योग्य संघ संयोजन होऊ शकले नाही.

१. तीन वर्षांपासून बाहेर असलेल्या उमेश यादवची संघात निवड?

कोणत्याही मोठ्या संघात एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला किंवा तो काही कारणाने संघातून बाहेर पडला तर संघ व्यवस्थापन युवा खेळाडूंवर विश्वास ठेवते, मात्र टीम इंडियामध्ये याच्या उलट घडत आहे.

टी 20 वर्ल्डकप साठी काहीही! द्रविडच्या एका शब्दावर बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय
मोहम्मद शमी करोना पॉझिटिव्ह असल्याने संघाबाहेर असल्याने ३४ वर्षीय वेगवान गोलंदाज उमेश यादवचे संघात पुनरागमन झाले आहे. उमेशने २०१९ मध्ये शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्याला अंतिम अकरामध्येही संधी देण्यात आली आहे. त्याच वेळी, भारतीय संघात आणि आयपीएलमध्ये सतत खेळणारा आणि चांगली कामगिरी करणारा दीपक चहर डग-आउटमध्ये बसल्याचे चित्र दिसत होते. विशेष म्हणजे दीपक चहरचा विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंमध्ये समावेश आहे. तर उमेश यादव विश्वचषकाच्या मुख्य संघाचा किंवा राखीव संघाचाही भाग नाही. तरीही, अंतिम अकरामध्ये त्याचा समावेश आहे.

२. २०२१ नंतर अश्विन अचानक संघात कसा आला?

२०२१ च्या टी-२० विश्वचषकात अश्विन संघाचा भाग होता. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही त्याला संधी मिळाली. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी, त्याने भारतासाठी शेवटचा टी-२० सामना खेळला. त्यानंतर ८ महिने तो क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉरमॅटमधून बाहेर होता आणि अचानक २९ जुलै २०२२ रोजी तो वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० सामना खेळायला गेला. त्यानंतर त्याला आशिया कपमध्ये संधी मिळाली आणि आता तो विश्वचषक संघाचाही एक भाग आहे. अशा परिस्थितीत आता प्रश्न पडतो की जर अश्विन इतका चांगला टी-२० गोलंदाज होता तर तो आठ महिने का बाहेर होता?

निवृत्तीनंतर काय करणार रॉजर फेडरर, केला मोठा खुलासा; देशासाठी करणार हे काम

३. भुवनेश्वर पुन्हा पुन्हा तीच चूक करतोय, तरीही संघ का साथ देत आहे?

आशिया कप २०२२ मधील भारत पाकिस्तान सुपर फोर सामन्यात भुवनेश्वरने १९व्या षटकात १९ धावा दिल्या. श्रीलंकेविरुद्धच्या पुढच्या सामन्यात त्याला पुन्हा गोलंदाजी देण्यात आली आणि त्याने १४ धावा खर्ची पाडल्या.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहितने पुन्हा भुवनेश्वरला डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करायला लावली आणि त्याने पहिल्या १७व्या षटकात १४ आणि नंतर १९व्या षटकात १६ धावा दिल्या. या वर्षात १३ डावांमध्ये भुवीने डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी केली आहे आणि या काळात त्याचा इकॉनमी रेट १०.७३ इतका आहे.

शिखर धवनने शेअर केला संतापजनक घटनेचा व्हिडिओ; कबड्डी खेळाडूंना शौचालयात दिले जेवण?

रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड कोणताही धाडसी निर्णय घेऊ शकत नाहीत. आशिया कपमध्ये दिनेश कार्तिकला संघातून वगळण्यात आले होते. त्याचवेळी दीपक हुडा संघात असूनही त्याने गोलंदाजी केली नाही, हे असे निर्णय आहेत जे आकलनापलीकडचे आहेत.

त्याचवेळी ऑस्ट्रेलियानेही पहिल्या सामन्यात भारताला आरसा दाखवला. ऑस्ट्रेलियाच्या संघ व्यवस्थापनाने कॅमेरून ग्रीनसारखा युवा खेळाडू पहिल्यांदाच सलामीला पाठवले आणि त्याने ६१ धावा केल्या. भारतीय संघ व्यवस्थापनालाही असे धाडसी निर्णय घ्यावे लागतील, अन्यथा विश्वचषक जिंकणेही कठीण होणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: